आजपासून देवमामलेदार यशवंतराव महाराज यात्रोत्सव

By Admin | Updated: January 4, 2016 23:02 IST2016-01-04T22:46:13+5:302016-01-04T23:02:28+5:30

आजपासून देवमामलेदार यशवंतराव महाराज यात्रोत्सव

Devamamladar Yashwantrao Maharaj Yatra Yatra from today | आजपासून देवमामलेदार यशवंतराव महाराज यात्रोत्सव

आजपासून देवमामलेदार यशवंतराव महाराज यात्रोत्सव

सटाणा : शहरातील ग्रामदैवत संतशिरोमणी देवमामलेदार यशवंतराव महाराजांच्या १८२ व्या पुण्यतिथीनिमित्त शहरात मंगळवार (दि. ५) पासून यात्रोत्सवास विविध कार्यक्र मांनी प्रारंभ होणार असल्याची माहिती तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांनी दिली.
यशवंतराव महाराज यात्रोत्सवा निमित्त ५ ते ९ जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. ५ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजता तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार, नेहा पोतदार, ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड, नगराध्यक्ष सुलोचना चव्हाण यांच्या हस्ते महापूजा करण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजेपासून रथ मिरवणूक, रात्री ११ वाजता कीर्तनाचा कार्यक्र म होईल. ६ ते ९ जानेवारी दररोज भाविकांसाठी ट्रस्टतर्फे महाप्रसादाचा कार्यक्र म ठेवण्यात आला असून, ९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेपासून आरम नदीपात्रात कुस्त्यांची दंगल भरविण्यात येणार आहे. सायंकाळी ६ ते ८ दहीकाला व कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.(वार्ताहर)

Web Title: Devamamladar Yashwantrao Maharaj Yatra Yatra from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.