भाजपला सत्तेतून खेचण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:10 IST2021-01-01T04:10:27+5:302021-01-01T04:10:27+5:30

शिवसेना महानगरप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल बडगुजर यांचा सिडको उपविभाग शिवसेनेच्या वतीने गणेश चौक येथे नागरी सत्कार करण्यात आला, ...

Determination to pull BJP out of power | भाजपला सत्तेतून खेचण्याचा निर्धार

भाजपला सत्तेतून खेचण्याचा निर्धार

शिवसेना महानगरप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल बडगुजर यांचा सिडको उपविभाग शिवसेनेच्या वतीने गणेश चौक येथे नागरी सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. सिडको हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, २०१७च्या निवडणुकीत या प्रभागातून या पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. २०२२च्या निवडणुकीत सिडकोतून सर्वच्या सर्व नगरसेवक निवडून आणण्याचा आपला संकल्प असून, तो सिद्धीस नेणारच, असा आत्मविश्वासही बडगुजर यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, खासदार हेमंत गोडसे, सिडकोचे सभापती चंद्रकांत खाडे, अमोल जाधव, दत्ता गायकवाड, शिवाजी चुंबळे, मामा ठाकरे, डी. जी. सूर्यवंशी, रत्नमाला राणे, सुवर्णा मटाले, संगीता जाधव, सीमा निगळ, शामकुमार साबळे, अजितभाई सय्यद, पुंजाराम गामणे, सुभाष गायधनी, विष्‍णू पवार, नाना पाटील, रमेश उघडे, बबलू सूर्यवंशी, नीलेश साळुंखे, पवन मटाले, प्रतापराव पाटील आदी उपस्थित होते. स्वागत रमेश उघडे, विष्णू पवार यांनी तर आभार सुभाष गायधनी, नाना पाटील यांनी मानले.

फोटो ओळी :

सत्काराप्रसंगी बोलताना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, समवेत विजय करंजकर, खासदार हेमंत गोडसे, सभापती चंद्रकांत खाडे, अमोल जाधव, दत्ता गायकवाड, शिवाजी चुंबळे, कैलास चुंभळे, रमेश उघडे, विष्णू पवार, नाना पाटील, सुभाष गायधनी, मामा ठाकरे, डी. जी. सूर्यवंशी आदी.

Web Title: Determination to pull BJP out of power