तालुका दारूमुक्त करण्याचा निर्धार
By Admin | Updated: April 29, 2017 01:09 IST2017-04-29T01:08:55+5:302017-04-29T01:09:05+5:30
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील दलपतपूर येथे महिलांनी व गावातील तरु णींनी एकत्र येत गौराईच्या सणातून दारूबंदीचा एल्गार पुकारला आहे.

तालुका दारूमुक्त करण्याचा निर्धार
त्र्यंबकेश्वर : अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर ‘बंद करा बंद करा, दारूविक्र ी बंद करा’ अशा आशयाचे फलक लावत आज तालुक्यातील दलपतपूर येथे महिलांनी व गावातील तरु णींनी एकत्र येत गौराईच्या सणातून दारूबंदीचा एल्गार पुकारला आहे. डोक्यावर धान्याची उगवलेली गौर तर गौराईत दारूबंदीचा संदेश देणारे पोष्टर लावून संपूर्ण गावातून वाद्यांच्या तालावर वाजत-गाजत मिरवणूक काढून दारूबंदीचा संदेश दिला आहे.
दलपतपूरच्या महिलांनी दारूबंदीसाठी पुढाकार घेतल्याने हरसूल बाजारपेठेतील दारू दुकाने कडकडीत बंद आहेत. आगामी काळात संपूर्ण हरसूल भागात व त्र्यंबकेश्वर तालुक्यात दारूबंदी मोहीम कडक करणार असल्याचे उपसभापती रवींद्र भोये यांनी सांगितले. त्यांनी दारूबंदीची लढाई यापुढेही कायम सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले
आहे. दारूबंदीसाठी महिलांचे एकत्रिकरण झाल्याने परिसरातील दारूविक्रेते चांगलेच धास्तावले आहेत. कडक दारूबंदी व पुढील काळात संपूर्ण भागातील दारूबंदी करण्याची मागणी परिसरात जोर धरू लागली आहे. यावेळी गावचे सरपंच काशिनाथ भोये, उपसरपंच कविता भोये यांच्यासह ग्रामस्थ, तरु ण, व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने दारू-बंदी मोहिमेचे स्वरूप तीव्र झाले आहे. (वार्ताहर)