घरफोडीतील संशयितास अटक
By Admin | Updated: August 18, 2016 01:13 IST2016-08-18T01:12:58+5:302016-08-18T01:13:25+5:30
घरफोडीतील संशयितास अटक

घरफोडीतील संशयितास अटक
पंचवटी : गेल्या आठवड्यात हिरावाडी रोडवरील सिंघानिया यांच्या बंगल्यात मध्यरात्री घरफोडी करून सिंघानिया यांच्यावर शस्त्राने वार करून ५० हजारांची रोकड चोरणाऱ्या संशयिताला पंचवटी पोलिसांनी पेठमधून ताब्यात घेतले आहे.
देवीदास रामा वैजल राहणार पोंड्याचा पाडा, भुवन तालुका पेठ असे संशयिताचे नाव आहे. गेल्या आठवड्यात मध्यरात्री वैजल याने हल्दी लॉन्सचे मालक नितीन हेमचंद सिंघानिया यांच्या बंगल्यात घरफोडीच्या उद्देशाने प्रवेश करून घरातील वस्तूंची उस्तार- पास्तर केली. त्यानंतर खोलीतील कपाट तोडत असताना आवाजाने सिंघानिया जागे झाले. त्यांनी संशयिताला विरोध करण्यासाठी झटापट केली असता संशयिताने धारदार शस्त्राने सिंघानिया यांच्यावर वार करत ५० हजारांची रोकड चोरून पलायन केले. बंगला मोठा असल्याने एक ते दीड तास हा प्रकार सुरू होता. या घटनेनंतर सिंघानिया यांनी पोलिसांना माहिती कळविताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोलिसांना सीमकार्ड नसलेला एक बंद मोबाइल मिळाल्याने तो जप्त केला होता.