सटाण्यात मटका अड्डे उद्ध्वस्त; तीन जणांना अटक

By Admin | Updated: September 25, 2015 00:13 IST2015-09-25T00:12:46+5:302015-09-25T00:13:12+5:30

सटाण्यात मटका अड्डे उद्ध्वस्त; तीन जणांना अटक

Destroying the premises of the premises; Three people are arrested | सटाण्यात मटका अड्डे उद्ध्वस्त; तीन जणांना अटक

सटाण्यात मटका अड्डे उद्ध्वस्त; तीन जणांना अटक


सटाणा : शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरुद्ध सटाणा पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. बुधवारी शहरातील तीन ठिकाणी मोबाइलवर मटका खेळणाऱ्या अड्ड्यांवर छापे टाकून आठ हजारांच्या रोकडसह तीस हजारांचे मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक करून गुन्हा दाखल केला
आहे.
शहरात सुरू असलेल्या
अवैध धंद्यांविरु द्ध सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पी.टी. पाटील यांनी धडक मोहीम
हाती घेऊन अड्डे उद्ध्वस्त केले होते. यामुळे गुंडांच्यादेखील मुसक्या आवळल्या गेल्या होत्या. मात्र तरीदेखील काही सराईत गुन्हेगारांनी मोबाइलद्वारे ठिकठिकाणी मटका सुरू केला असल्याची माहिती मिळाली होती.
बुधवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक पाटील यांनी हवालदार शीतल गायकवाड, भास्कर सोनवणे, पुंडलीक डंबाळे यांच्या सहकार्याने शहरातील मौलाना आझाद चौकातील पानटपरी, ताहाराबाद रोडवरील कुशन दुकान व आरम नदीपात्रात छापे टाकून आठ हजारांच्या रोकडसह तीस हजारांचे मटक्याचे साहित्य जप्त केले.
या प्रकरणी खलील शेख
महंमद शेख, किशनसिंग भरपूरसिंग पोथीवाल, तुळशीराम कृष्णा
यांना अटक करून गुन्हा दाखल
केला आहे. अधिक तपास
पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.

Web Title: Destroying the premises of the premises; Three people are arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.