भाजीपाल्याची आवक घटूनही मागणीअभावी दर कमीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:18 IST2021-09-06T04:18:17+5:302021-09-06T04:18:17+5:30
चौकट- कारले ७ रुपये किलो घाऊक बाजारात कारल्याला जास्तीत जास्त ७ रुपये तर काकडीला अधिकाधिक १६.५० रुपये किलोचा दर ...

भाजीपाल्याची आवक घटूनही मागणीअभावी दर कमीच
चौकट-
कारले ७ रुपये किलो
घाऊक बाजारात कारल्याला जास्तीत जास्त ७ रुपये तर काकडीला अधिकाधिक १६.५० रुपये किलोचा दर मिळत आहे. कोबीला अवघा पाच रुपये किलोचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
चौकट-
नारळ ४२ रुपये नग
बाजार समितीत नारळांची आवक मर्यादित असल्याने घाऊक बाजारात नारळ २५ पासून ४२ रुपये नग याप्रमाणे विक्री होत आहे. तर सफरचंदाला ८० ते १५० रुपये आणि संत्र्याला २५ ते ४५ किलोचा दर मिळत आहे.
चौकट-
मसूरडाळ तेजीत
किराणा बाजारात सध्या मसूरडाळ तेजीत असून इतर वस्तूंच्या दरांमध्ये फारसा चढउतार झालेला नाही. मागील दोन सप्ताहांपासून डाळींच्या दरात वाढ झालेली असून ती अद्याप कायम आहे. खाद्यतेल गेल्या काही दिवसांत स्थिर आहे.
कोट-
सणासुदीचे दिवस असल्यामुळे किराणा बाजारात सध्या ग्राहकी चांगली असल्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे. या सप्ताहात किराणा मालात फारसा चढउतार झालेला नसला तरी मसूरडाळ मात्र थोड्याफार प्रमाणात तेजीकडे झुकली आहे.
- अनिल बुब, किराणा व्यापारी
कोट-
मागीलवर्षी टोमॅटोला चांगला दर मिळत होता. म्हणून यावर्षी पुन्हा टोमॅटोची लागवड केली. पण यावर्षी खर्च निघणेही कठीण झाले आहे. भाजीपाला पिकविणे सध्यातरी परवडेनासे झाले आहे.
- ज्ञानेश्वर गायधनी, शेतकरी
कोट-
किरकोळ विक्रेत्यांकडे कोणतीही भाजी १०-२० रुपयांच्या खाली नाही. एक कमी झाले तर दुसरे कशाचे तरी दर वाढतात. आता भाज्या आवाक्यात आल्या आहेत तर लगेचच गॅसचे दर वाढले आहेत. सर्वसामान्यांनी करायचे काय
- रोहिणी गायकवाड, गृहिणी