पाण्यासाठी नाशिककरांना वणवण
By Admin | Updated: May 4, 2015 00:43 IST2015-05-04T00:42:49+5:302015-05-04T00:43:11+5:30
पाण्यासाठी नाशिककरांना वणवण

पाण्यासाठी नाशिककरांना वणवण
नाशिक : गंगापूर धरणावरील पंपिंग स्टेशनवरील इलेक्ट्रिक उपकेंद्रावरील दुरुस्ती अन्य दोन ते तीन ठिकाणी दुरुस्तीची कामे करण्यात आल्याने शनिवारी (दि.२) शहराचा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहिला. त्याचप्रमाणे आज रविवारी (दि.३) काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा, तर काही भागांमधील नळ कोरडेच राहिल्याने पाण्यासाठी नाशिककरांना वणवण करावी लागल्याचे चित्र पहावयास मिळाले.बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रावर व्हॉल्व्ह बसविणे, कुसुमाग्रज उद्यान येथे जलवाहिनीची क्रॉस जोडणी करण्याबरोबरच जगझाप मार्गावरील जलवाहिनीची गळती दुरुस्त करण्याचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने शनिवारी हाती घेण्यात आले होते. यामुळे शनिवारी सकाळचा पाणीपुरवठा रात्री दहा वाजेपर्यंत बंद राहणार असल्याचे संबंधित विभागाकडून जाहीर करण्यात आले होते. रविवारी सकाळीदेखील कमी दाबाने शहर व परिसरात पाणीपुरवठा क रण्यात येईल; मात्र रविवारी सकाळी शहरातील जुने नाशिक, हनुमानवाडी, रामवाडी, पंचवटी परिसर, वडाळागाव, डीजीपीनगर आदि परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा झाला तसेच शहराच्या काही भागांमध्ये मात्र पाणीपुरवठा बंद राहिल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी रणरणत्या उन्हात पायपीट करावी लागली. एकूण दुरुस्तीच्या विविध कामांमुळे विस्कळीत झालेल्या दैनंदिन पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांनी मे महिन्याच्या तिसऱ्याच दिवशी ती पाणीटंचाई अनुभवली.