नाशिक : राष्टÑ उभारणीसाठी आवश्यक असलेल्या विचारांचा संगम आज पूर्णत: भ्रष्ट झालेला दिसून येतो. असे होणे अत्यंत गंभीर व राष्टÑहिताच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. राज्यकर्त्यांना प्रश्न विचारणाऱ्यांना देशाची काळजी असते, त्यामुळे ते देशप्रेमीच आहेत; मात्र त्यांच्या प्रश्नांची उत्तरे न देणारे लोक देशद्रोही वाटतात, असे परखड मत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केले.विचार जागर मंच व कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने तिसरे मार्क्स, गांधी, आंबेडकर विचारमंथन संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संमेलनाचे उद्घाटक म्हणून गांधी बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक उत्तम कांबळे, रावसाहेब कसबे, श्रीपाद जोशी, डॉ. गोपाळ गुरु, रामचंद्र जाधव आदी उपस्थित होते. यावेळी गांधी यांनी मूलतत्त्ववादी विचारधारेवर जोरदार टीका करीत आंबेडकर-महात्मा गांधी यांच्याविषयी गैरसमज पसरविणाºयांचा समाचार घेतला. ते म्हणाले, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्येही वैचारिक मतभेद असतील, मात्र त्यांनी कधीही एकमेकांचा द्वेष केला नाही, असे सांगितले. गांधीजींच्या खुनाच्या खटल्याप्रसंगी डॉ. आंबेडकर कायदा मंत्रिपदावर असतानाही ते सुनावणीच्या वेळी जातीने उपस्थित राहत होते. त्यामुळे आंबेडकर व गांधी यांनी एकमेकांना कधीही आपले शत्रू मानले नाही. या दोघांना मानणाºया वर्गापैकी काही भक्तांनी आपली तर्कबुद्धी गहाण ठेवून गांधी-आंबेडकरांमध्ये शत्रुत्व निर्माण करून त्यांच्यावर अन्याय केला.‘चंपारण्य-खेडा’नंतरही शेतकºयांच्या समस्या ज्वलंतचंपारण्य व खेडा सत्याग्रह १९१८साली बापूंनी केला; मात्र त्यानंतरही शेतकºयांचे प्रश्न आजही तितकेच ज्वलंत वाटत आहेत. न्याय मागण्यासाठी शेतकरी नाशिक-मुंबई अशी पायपीट करत सत्ताधाºयांच्या द्वारावर मोर्चाने धडकला, हा पुरावा पुरेसा आहे शेतकºयांच्या व्यथा सांगण्यासाठी. आजही या सरकारच्या काळात मजूर, कष्टकरी कामगार, शेतकरी, दलित असे सर्वच घटक असुरक्षित झाले आहेत. मार्क्स, गांधी, आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानावर व्याख्याने देऊन आता काही साध्य होणार नाही, तर सरकारला आव्हान देण्यासाठी लढा उभारावा लागेल, असे तुषार गांधी म्हणाले. पुणे करारावर बाबासाहेबांनी गांधीजींच्या हट्टापोटी स्वाक्षरी केली असे म्हणणे चुकीचे आहे. त्यांनी स्वाक्षरी राष्टÑप्रेम व देशभक्ती मधून केली होती. त्यावेळी इंग्रज राजकीय विभागणी करण्याचा डाव आखत होते, याची जाणीव बाबासाहेबांना होती, असे गांधी यांनी सांगितले.
राज्यकर्त्यांना प्रश्न विचारणारे देशप्रेमीच! तुषार गांधी : मार्क्स, गांधी, आंबेडकर संमेलनात पुरोगामी वैचारिक मंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 01:29 IST
नाशिक : राष्टÑ उभारणीसाठी आवश्यक असलेल्या विचारांचा संगम आज पूर्णत: भ्रष्ट झालेला दिसून येतो. असे होणे अत्यंत गंभीर व राष्टÑहिताच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे.
राज्यकर्त्यांना प्रश्न विचारणारे देशप्रेमीच! तुषार गांधी : मार्क्स, गांधी, आंबेडकर संमेलनात पुरोगामी वैचारिक मंथन
ठळक मुद्देमहात्मा गांधी यांच्याविषयी गैरसमज पसरविणाºयांचा समाचार आंबेडकर व गांधी यांनी एकमेकांना कधीही आपले शत्रू मानले नाही