देशमाने ग्रामपंचायतीत परिवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 01:26 IST2021-01-19T20:26:21+5:302021-01-20T01:26:19+5:30
मानोरी : येवला तालुक्यातील देशमाने बुद्रुक व खुर्द ग्रामपंचायतीवर मागील १५ वर्षांपासून एकहाती सत्ता असलेल्या मातब्बरांना धक्का देत ११ जागेसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत परिवर्तन पॅनलने ८ जागांवर विजय मिळवला. ग्रामविकास पॅनलला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

देशमाने ग्रामपंचायतवर ' परिवर्तन ' पॅनलचे वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर आनंदोत्सव साजरा करताना उमेदवार आणि कार्यकर्ते.
मानोरी : येवला तालुक्यातील देशमाने बुद्रुक व खुर्द ग्रामपंचायतीवर मागील १५ वर्षांपासून एकहाती सत्ता असलेल्या मातब्बरांना धक्का देत ११ जागेसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत परिवर्तन पॅनलने ८ जागांवर विजय मिळवला. ग्रामविकास पॅनलला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
येथील ४ वॉर्डापैकी ३ वॉर्डात परिवर्तन पॅनलचे वर्चस्व दिसून आले. यावेळी परिवर्तन पॅनलच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आणि फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. विजयी उमेदवार पुढील प्रमाणे, वॉर्ड क्रमांक १ - आण्णा यशवंत पवार, सोनाली शरद गोरे व इंदूबाई बबन आरगडे. वॉर्ड क्रमांक २ - बापू ज्ञानदेव काळे, मंदा हरिभाऊ औटी व सुमनबाई वामन आरगडे.
वॉर्ड क्रमांक ३ - प्रमोद भास्कर दुघड, सरला सुभाष जगताप. वॉर्ड क्रमांक ४- यशवंत रामचंद्र जगताप, संजय मोतीराम खैरनार व शोभा रायभान दुघड.