शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

साध्वी प्रज्ञासिंग प्रकरणी निवेदने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 01:00 IST

मुंबईवरील अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले वरिष्ठ पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांची चौकशी करण्यात येऊन त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी काही संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे.

नाशिक : मुंबईवरील अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले वरिष्ठ पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांची चौकशी करण्यात येऊन त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी काही संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे.संगिनी महिला जागृती मंडळाच्या वतीने याप्रकरणी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. शहीद करकरे यांच्याविषयी केलेल्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येऊन याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करावी, त्यांचा जामीन रद्द करावा, त्यांची उमेदवारी रद्द करावी, सार्वजनिक ठिकाणच्या जाहीर कार्यक्रमांना त्यांना बंदी घालावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. याप्रसंगी मंडळाच्या कल्याणी अनिता मनोहर, शीतल पवार, राहुल जºहाड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.छात्र भारतीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेनात साध्वीचे वक्तव्य निषेधाहार्य असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यांना निवडणूक लढण्यास मज्जाव करावा, शहीद प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर राकेश पवार, सदाशिव गणगे, निवृत्ती खेताडे, आम्रपाली वाकळे, राम सूर्यवंशी, देवीदास हजारे, भालचंद्र राजपूर, समाधान बागूल, सागर चित्ते, अनिकेत काची आदींच्या स्वाक्षरी आहेत.भारतीय ट्रेड युनियनतर्फे निषेधसाध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले तत्कालीन एटीएसचे प्रमुख अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी जी भाषा वापरली आहे त्याचा भारतीय ट्रेड युनियन केंद्राने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. यासंबंधी जिल्हाधिकाºयांनी निवेदन देण्यात आले आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असेही या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर डॉ. डी. एल. कराड, अ‍ॅड. वसुधा कराड, श्रीधर देशपांडे, सीताराम ठोंबरे, तानाजी जायभावे, देवीदास आडोळे, दिनेश सातभाई, सिंधू शार्दुल, कल्पना शिंदे आदिंच्या स्वाक्ष-या आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय