उपआयुक्त बारगळ अखेर रजेवर
By Admin | Updated: November 24, 2015 23:39 IST2015-11-24T23:38:56+5:302015-11-24T23:39:24+5:30
उपआयुक्त बारगळ अखेर रजेवर

उपआयुक्त बारगळ अखेर रजेवर
नाशिक : शेतकरी आणि पत्रकार मारहाण प्रकरणी पोलीस उपआयुक्त अविनाश बारगळ हे अखेर रजेवर गेले आहेत. पोलीस आयुक्त जगन्नाथन यांनी संपादकांच्या बैठकीत ही माहिती दिली.
गेल्या शनिवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या दौऱ्यात आंदोलनाच्या वेळी हा प्रकार घडला होता. आंदोलक शेतकऱ्यांपाठोपाठ पत्रकारांनाही मारहाणीची घटना घडली होती. यासंदर्भात मंगळवारी संपादकांच्या बैठकीत बोलताना जगन्नाथन यांनी आपण या विषयाकडे व्यक्तिगत लक्ष घातले आहे, असे सांगितले. त्या घटनेप्रसंगी उपस्थित असलेल्या अन्य प्रत्यक्षदर्शींचे जाबजबाबदेखील नोंदविण्यात आले आहे. तसेच पुरावे संकलनालाही पोलिसांकडून गती देण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी सुरू करण्यात येणार असल्याचे आयुक्त जगन्नाथन यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी व तपास करण्याचे आदेश पोलीस उपआयुक्त विजय पाटील यांना देण्यात आले असून चार प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)