शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

गुणपत्रिकेतून नापास शेरा हद्दपार करणे स्वागतार्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 00:52 IST

राज्य सरकारने अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना रोजगारक्षम करण्यासाठी ‘कौशल्य सेतू अभियान’ योजना राबवण्यास मान्यता दिली आहे. परिणामी, दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिकेवर आता ‘नापास’ किंवा ‘अनुत्तीर्ण’ शेरा हद्दपार होणार आहे. त्याऐवजी नापास विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘कौशल्य विकासास पात्र’ असा शेरा दिला जाणार आहे.

माझे मत

नाशिक : राज्य सरकारने अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना रोजगारक्षम करण्यासाठी ‘कौशल्य सेतू अभियान’ योजना राबवण्यास मान्यता दिली आहे. परिणामी, दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिकेवर आता ‘नापास’ किंवा ‘अनुत्तीर्ण’ शेरा हद्दपार होणार आहे. त्याऐवजी नापास विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘कौशल्य विकासास पात्र’ असा शेरा दिला जाणार आहे.याबाबतचा शासन निर्णय हा कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने जारी केला असून, तसा प्रस्ताव राज्य शिक्षण मंडाळाकडे पाठवण्यात आला आहे. या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत केले जात असून, हा निर्णय समाधानकारक असल्याचे मत काही मुख्याध्यापक, शिक्षकांनी व्यक्त केले आहे.शासनाच्या या निर्णयाचे स्वागत आहे. विद्यार्थी नापास झाल्यास खचून जातो. त्यामुळे नापास ऐवजी ‘कौशल्य विकासास पात्र’ असा शेरा दिल्याने तो आपला विश्वास गमावणार नाही आणि त्याला आपल्या कौशल्यातून आपल्या पायावर उभे राहण्यास मदत होणार आहे.- गणेश टर्ले, शिक्षक,किमान कौशल्य विभागनापास झाल्यावर विद्यार्थ्यात नैराश्य निर्माण होते. मात्र या निर्णयामुळे अशा विद्यार्थ्यांना उद्योगधंद्यांकडे वळण्यासाठी एक नवी दिशा मिळणार आहे. नापास ऐवजी कौशल्य विकास पात्र या शेरामुळे त्याला कौशल्य विकास योजनेअंतर्गत असलेल्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळेल व तो त्यामधून आपले आयुष्य सुकर करु शकतो. मात्र विद्यार्थ्यांनीही पास होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.- पुरुषोत्तम रकिबे, प्राचार्य, शिवाजी विद्यालय, शिंदेगावकाही विद्यार्थी नावालाच पास होण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र नापासचा शिक्का बसल्यावर त्याला बाहेर कुठल्याही अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत नाही. मात्र कौशल्य विकास अभियानातून त्याला आपले भविष्य नव्याने घडविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अभ्यासात कमी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र अभ्यास करुन चांगले गुण मिळविण्याचाही प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला पाहिजे.- अरुण पवार, मुख्याध्यापक, मराठा हायस्कूलसरकारच्या या निर्णयाचे स्वागत आहे. नापास झाल्यावर बऱ्याचदा विद्यार्थ्यी नैराश्याच्या गर्तेत जातात. कौशल्य विकासमुळे त्याला कलेला चालना देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. मुलांमध्ये अनेक कौशल्य असतात मात्र विज्ञान, गणिताच्या चौकटीत त्यांना याकडे लक्ष देता येत नाही.- एस. बी. देशमुख, सचिव,जिल्हा मुख्याध्यापक संघकाय आहे कौशल्य सेतू अभियान?कौशल्य सेतू अभियानामध्ये दहावी व बारावी अनुत्तीर्ण झालेल्या मुला-मुलींना जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जातो. संपूर्ण राज्यात अशी १११ प्रशिक्षण केंद्रे उपलब्ध असून यामध्ये ‘नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ अंतर्गत ‘यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स’ व ‘नॅशनल युवा कोआॅपरेटिव्ह सोसायटी’ या दोन संस्थांच्या माध्यमातून सहा महिने कालावधीसाठी प्रशिक्षण देण्यात येते. यात मोबाइल रिपेअरिंग, असिस्टंट इलेक्ट्रिशियन, आॅटोमोबाइल सर्व्हिस टेक्निशियन, मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग, डीटीएच सेट टॉप बॉक्स इन्स्टॉलेशन अँड सर्व्हिस टेक्निशियन अशा ९०० कौशल्य विकास अभ्यासक्र मांच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जातो. प्रॅक्टिकल ट्रेनिंगवर भर असलेले हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येते.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी