५७ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त
By Admin | Updated: February 26, 2017 00:09 IST2017-02-26T00:08:50+5:302017-02-26T00:09:14+5:30
नाशिकरोड : पक्षीय बंडखोर अन् अपक्षांचाही समावेश

५७ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त
नाशिकरोड : मनपा निवडणुकीत नाशिकरोड विभागांच्या सहा प्रभागांत राष्ट्रवादी, कॉँग्रेस, मनसे, रिपाइं, बसपा, भारिप, एमआयएम आदि पक्षांसह एकूण ५७ उमेदवारांची अनामत रक्कम (डिपॉझीट) जप्त झाली आहे. यामध्ये पक्षीय बंडखोर व अपक्ष उमेदवारांचादेखील समावेश आहे. मनपा निवडणुकीत नाशिकरोडच्या सहा प्रभागांतील २३ जागांसाठी एकूण १७३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. गुरुवारी झालेल्या मतमोजणीनंतर एकूण ५७ उमेदवारांची अनामत रक्कम (डिपॉझीट) जप्त झाले आहे. विशेष म्हणजे यामध्ये भाजपा, शिवसेना वगळता प्रमुख राजकीय पक्ष, पक्षीय बंडखोर व अपक्षांचा समावेश आहे. अनामत रक्कम गमावलेले उमेदवार प्रभाग १७ अ- बाळासाहेब बाबूराव आहिरे (भारिप), अपक्ष - अनिल चुनीलाल बहोत, गणेश सुकदेव गांगुर्डे, संजू पुंजाजी गांगुर्डे, विजया रामकृष्ण केदारे, ब- अपक्ष- कलावती दिलीप गायकवाड, क - अपक्ष नलमारी रमादेवी रेड्डी, ड - अपक्ष - नरेंद्र रामदास आढाव, अशोक नारायण गायकवाड (भारतीय जनहित कॉँग्रेस पार्टी), तानाजी काशीनाथ लोखंडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस), अपक्ष- अभिषेक अशोक नितनवरे, विशाल गौतम तेजाळे (बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी), कैलास निवृत्ती तेलोरे (रिपाइं), प्रभाग १८ अ- मनोजकुमार नाना रोकडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस), अपक्ष- शालिग्राम विठ्ठल बनसोडे, शांता सिद्धार्थ शेजवळ, क- शोभा बाजीराव पेखळे (अपक्ष), ड - राजेंद्र रामचंद्र डेर्ले (राष्ट्रवादी कॉँग्रेस), विलासराज मोहन गायकवाड (जनसुराज्य शक्ती), अपक्ष- रवींद्र रामभाऊ गायधनी, हेमंत भास्कर पिंगळे, प्रभाग १९ अ- संतोष शंकर जाधव (बहुजन समाज पार्टी), संदीप शंकर काकळीज (भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस), सुनील संपत कांबळे (रिपाइं-ए), अनिल दिलीप मोरे (आंबेडकरी पार्टी आॅफ इंडिया), सचिन विलास चव्हाण (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), विकी (बबलू) अशोक खेलुकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस), हनिफ भाईमिया शेख (बसपा), रियाज शफोद्दीन शेख (बहुजन विकास आघाडी), बापू पांडुरंग सोनवणे (एमआयएम), अपक्ष- पांडुरंग भीमाजी गुरव, कय्युम कासम पटेल, तौफीक अलाउद्दीन पठाण, प्रभाकर बाळासाहेब साळवे, इरफान असगर शेख. प्रभाग २० अ - अरूण प्रभाकर शेजवळ (भारिप बहुजन महासंघ), अपक्ष- अनिल चुनीलाल बहोत, उदय फकिरा भालेराव, तुषार रमेश दोंदे, रविकिरण चंद्रकांत घोलप, नितीन पद्माकर पंडित, ड- नितीन पांडुरंग गुणवंत (अपक्ष), प्रभाग २१ अ - अपक्ष- सरला महेंद्र आहिरे, ब- धनंजय रामदास मंडलिक (अपक्ष), क - अपक्ष- प्रीती मोहन डेंगळे, रिजवान अल्ताफ सय्यद, ड - महेश झुंजार आव्हाड (माकप), अहमद अजिज शेख (बहुजन विकास आघाडी), गुलामगौस बाबुलाल शेख (एमआयएम), प्रभाग २२ अ - अमोल सिद्धार्थ घोडे (बहुजन विकास आघाडी), अपक्ष - प्रवीण विष्णु लासुरे, सुषमा रविकिरण घोलप, किरण चंदू राक्षे, लक्ष्मण शिवचरण वाल्मीकी, प्रभाग २२ ब - लता सीताराम जाधव, ड - चैतन्य प्रतापराव देशमुख, किशोर दत्तात्रय वाघ (बहुजन विकास आघाडी) या ५७ जणांची अनामत रक्कम (डिपॉझीट) जप्त झाली आहे. (प्रतिनिधी)