इगतपुरीत ३८ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

By Admin | Updated: February 27, 2017 01:14 IST2017-02-27T01:14:38+5:302017-02-27T01:14:53+5:30

घोटी : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ५९ पैकी १४ उमेदवारांची, तर पंचायत समितीच्या ५९ पैकी २४ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त निवडणूक आयोगातर्फे जप्त करण्यात आली.

Deposit of 38 candidates in Igatpura seized | इगतपुरीत ३८ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

इगतपुरीत ३८ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

घोटी : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ५९ पैकी १४ उमेदवारांची, तर पंचायत समितीच्या दहा जागांसाठीच्या ५९ पैकी २४ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त निवडणूक आयोगातर्फे जप्त करण्यात आली. निवडणुकीत अपेक्षित मते न मिळाल्यास उमेदवाराची अनामत जप्त करण्यात येऊन त्याला पुढील निवडणुकीत परिणामांना सामोरे जावे लागते.
शिवसेना जिल्हा परिषदेच्या पाच गटातील आणि पंचायत समिती १० गणांतील आपल्या सर्व उमेदवारांची अनामत रक्कम वाचविण्यात यशस्वी झाली आहे. भाजपासारख्या पक्षाच्या गटांतील ३ उमेदवारांची अनामत जप्त झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. घोटी गट आणि गणात इंदिरा काँग्रेसच्या उमेदवारांवर अनामत जप्त झाल्याची स्थिती उद्भवली आहे. राष्ट्रवादीला एका गटात, मनसेला दोन गटात, शेकापला एक गटात, तर रिपाइंला ३ गणात, माकपाला एक गट-गणात तर अपक्ष उमेदवारांतील गटांच्या ५ आणि गणांच्या ९ जणांवर अनामत जप्तीची नामुष्की ओढवली आहे.पक्षनिहाय अनामत जप्त झालेल्या उमेदवारांची नावे अशी- इंदिरा काँग्रेस- भास्कर गुंजाळ घोटी गट, संजय तिवडे घोटी गण, भाजपा- संदीप शहाणे घोटी गट, वसंत डामसे खेड गट, गीता लहांगे वाडीवऱ्हे गट, स्मितल नाठे वाडीवऱ्हे गण, हनुमंत निसरड नांदगाव बु।। गण, रत्ना गायकर मुंढेगाव गण, शोभा झनकर टाकेद बु।। गण, राष्ट्रवादी- नरेश (सोमनाथ) घारे नांदगाव सदो गट, वाघू पंडित नांदगाव सदो गण, शेकाप- सोमनाथ ठोकळ खेड गट, बबन जाधव घोटी गण, लहानूबाई कचरे खेड गण, माकपा- कुसूम बेंडकुळे वाडीवऱ्हे गट, शिवराम बांबळे शिरसाठे गण, मनसे - राजूबाई कौटे शिरसाठे गट, कोंडाजी तातळे खेड गट, पांडुरंग शेंडे, संगीता कोरडे, जयश्री जाधव. रिपाइं- मंगेश रोकडे, गौतम पंडित, मंगला झनकर. अपक्ष- केरू खतेले, आशा गवारी, अंजना बेंडकोळी, मच्छिंद्र भगत, आदिनाथ सोमवंशी, सविता नवाळे, नंदा बोराडे, पद्माबाई आगीवले, कविता खतेले, सुनीता खतेले, जिजाबाई तातळे यांचा समावेश आहे.(वार्ताहर)

Web Title: Deposit of 38 candidates in Igatpura seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.