परदेशी गॅँगची कारागृहात रवानगी
By Admin | Updated: July 30, 2016 01:10 IST2016-07-30T01:08:49+5:302016-07-30T01:10:35+5:30
परदेशी गॅँगची कारागृहात रवानगी

परदेशी गॅँगची कारागृहात रवानगी
नाशिक : हनुमानवाडीतील वाघ हत्त्या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी मोक्का अन्वये कारवाई केलेल्या परदेशी गँगच्या चौघा सराईत गुन्हेगारांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.काही दिवसांपूर्वी सराईत गुन्हेगार कुंदन परदेशी, करन परदेशी, अक्षय इंगळे, अजय बोरिसा, मयूर कानडे, श्रीनिवास कानडे, मयूर भावसार व आकाश जाधव यांनी अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने हनुमानवाडी कॉर्नरवर भेळपुरी हातगाडी लावणाऱ्या वाघ बंधूवर हल्ला चढविला होता. त्यात सुनील वाघ याची संशियतांनी लाकडी दांडका व दगडाने ठेचून हत्त्या केलीच होती, तर हेमंत वाघ हा गंभीर जखमी झाला होता. संशयित हेमंत गुन्हेगारी टोळीतील असल्याने व त्यांच्यावर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असल्याने यांच्यासह संशयितांवर मोक्का लावण्यात आला होता.या मोक्कातील गुन्हेगारांना न्यायालयात हजर केले असता गुन्हेगारांना पाठबळ देणाऱ्यांचा शोध घेणे कामी पोलिसांनी पोलीस कोठडी मागितली होती. (प्रतिनिधी)