संत निवृत्तिनाथ पालखीचे मंगळवारी होणार प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 01:31 IST2020-06-26T22:27:03+5:302020-06-27T01:31:47+5:30
संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ पालखीचे मंगळवारी (दि. ३०) मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत शिवशाही पालखीने प्रस्थान होणार आहे.

संत निवृत्तिनाथ पालखीचे मंगळवारी होणार प्रस्थान
त्र्यंबकेश्वर : संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ पालखीचे मंगळवारी (दि. ३०) मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत शिवशाही पालखीने प्रस्थान होणार आहे.
पालखी दिंडी प्रस्थानाच्या दोन ते तीन दिवस अगोदरपासून संपूर्ण त्र्यंबकेश्वर गाव परिसरातील नाशिक जिल्ह्यातील वारकऱ्यांनी फुलून गेलेले असते. मंदिरात अभंग, कीर्तन, भजन, भारुड आदी कार्यक्रमांनी मंदिर गजबजून जाते. तथापि पालखी प्रस्थान होऊन १६ दिवस होऊन गेले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी पायी दिंडीने जाण्यास महाराष्ट्र शासनाने मनाई केली. यास्तव येत्या मंगळवारी, आषाढ शु. १० रोजी परिवहन महामंडळाचा शिवशाही बसने पालखी प्रस्थान होणार आहे
त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर ज्येष्ठ पौर्णिमा (वटपौर्णिमा) किंवा ज्येष्ठ व. १ रोजी आपल्या दिंडी परंपरेप्रमाणे पालखी प्रस्थान होत असते. पण यावर्षी पायी दिंडी सोहळा रद्द झाल्याने शिवशाही बसने जवळपास २० ते २५ वारकरी पंढरपूर येथे निघणार आहेत.
मंगळवारी सकाळी १० वाजेपूर्वी पूजा, अभंग, भजन म्हणून पालखी शिवशाहीत ठेवण्यात येणार आहे. नंतर बसचे प्रस्थान होईल. मग बसमध्येच भजन, अभंग व कीर्तनदेखील होईल. पालखी जाण्यास अवघे तीन दिवस उरले असले तरी मंदिर परिसरात शुकशुकाट आहे.