वारकरी प्रतिक्रिया....नाशिक : गेली २२ वर्षे सलग पांडुरंगाच्या भेटीला वारीच्या माध्यमातून जात आहे. अपवाद मागील वर्षीचा. ती भर यंदा पांडुरंगानेच भरून काढली, कारण शासनाने दिलेल्या परवानगीतील ४० लोकांमध्ये माझा नंबर लागला. मी भाग्यवान समजतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेला निर्णय योग्य असला तरी त्यांना देवाने बुध्दी दिली की, किमान ४० लोकांसाठी वारीला परवानगी दिली.- वसंत गटकळ, शिवनई, दिंडोरी कोरोनापासून संरक्षणाकरिता राज्य परिवहन महामंडळाच्या बसद्वारे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीला मान्यता दिल्याने वर्षभराच्या विश्रांतीनंतर माझ्यासारख्याला विठूरायाच्या चरणी लीन होण्याची संधी मिळणार आहे. मला खूप आनंद झाला आहे, पण सर्वांनाच जाता आले असते तर अधिक समाधान वाटले असते. त्यामुळे भावना व्यक्त करता येत नाहीत.- उत्तम आडके, नाणेगाव, इगतपुरी. गेली १५ वर्षे पांडुरंगाच्या भेटीला जात आहे. मागील वर्षी शासनानेच परवानगी न दिल्याने वारीत सहभाग घेता आला नाही. ती संधी यंदा मिळाली. पांडुरंगाने भेटीला बोलावल्याने कोणताही अडथळा आला नाही. त्यामुळे कंठ दाटून येतोय. देवाला सर्वच सारखे, तरीपण मला वारीला जाता येणार आहे. अन्य भाग्यवंतांना सोडून जाताना खूपच वाईट वाटत आहे.- भगीरथ काळे, खशरणगाव, सिन्नर विठूरायाच्या भेटीला आतुर झालो होतो. कारण मागील वर्षी वारीला जाता आले नाही. गेली तीस वर्षे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीत मी सहभागी असतो. राज्य सरकारने ४२ दिंड्यांमधून २५ दिंड्यांमधील प्रतिनिधी निवडले गेले त्यात मी आहे. विठूरायाच्या आणि माझ्या भेटीचे एक प्रकारे गणित ठरले आहे. मागील वर्षी हे गणित बिघडले होते. आता ते जुळून आले आहे.- गंगाधर काकड, मखमलाबाद, नाशिक मी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीत २० वर्षांपासून जात असतो. मागील वर्षी वारीच नव्हती. आता एकविसावी वारी करीत आहे. पखवाज वाजवीत असतो. त्यामुळे मी माझे नशीब समजतो. माझे संपूर्ण कुटुंब पिढीजात वारीत सहभाग घेत आहे. आता गेली ३ वर्षे मी आळंदीतच राहात आहे. वारीच्या निमित्ताने माझे नाव आल्यामुळे मी नाशिकहूनच वारीत सहभागी होत आहे.- खुशाल चवडगीर, नांदगाव, येवलाआजोबा-आजी, आई-वडील यांच्यामुळे तीन वर्षांचा असल्यापासून दिंडीद्वारे वारीत सहभागी असतो. २०२० वर्ष सोडले तर कधीच खंड पडलेला नाही. आता ४० भक्तांमध्ये मला संधी मिळाली, पण मी कमनशिबी ठरलो. कारण प्रकृती बरी नसल्याने मला जाता येत नाही. त्यामुळे शरीराबरोबरच मनानेदेखील खचलो आहे. मात्र ही भर पुढील वर्षी भरून काढेन.- कृष्णा कमानकर, भेडाळी, निफाड
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ पालखी प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 00:29 IST
वारकरी प्रतिक्रिया.... नाशिक : गेली २२ वर्षे सलग पांडुरंगाच्या भेटीला वारीच्या माध्यमातून जात आहे. अपवाद मागील वर्षीचा. ती भर यंदा ...
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ पालखी प्रस्थान
ठळक मुद्दे विठूरायाच्या चरणी लीन होण्याची संधी मिळणार