घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील गजानन मित्र मंडळाच्या साई पालखीचे शिर्डीला प्रस्थान झाले. कोरोनाची स्थिती पाहता शासन नियमांचे पालन करत मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत व अटीशर्थीचे पालन करत उत्साहात मार्गस्थ झाली.यावर्षी शासन नियमाप्रमाणे केवळ ५० भाविकांच्या उपस्थितीत पालखी काढण्यात आली. मंगळवारी (दि.१९) प्रारंभी सकाळी घोटीतील उद्योजक निखिल गोठी यांच्या हस्ते पालखी पूजन, अभिषेक व आरती करण्यात आली.यावेळी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, जिल्हा परिषद सदस्य नयना गावित, गणपत कडू, सरपंच सचिन गोणके, उपसरपंच रामदास भोर, संजय आरोटे, ग्रामपालिका सदस्य स्वाती कडू, हिरामण कडू, पंचायत समिती सदस्य अण्णा पवार, श्रीकांत काळे, माजी उपसरपंच रामदास शेलार,रविंद्र तारडे, भाऊसाहेब शेलार यांच्यासह भाविक उपस्थित होते.
घोटीतील साई पालखीचे शिर्डीला प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 18:30 IST
घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील गजानन मित्र मंडळाच्या साई पालखीचे शिर्डीला प्रस्थान झाले. कोरोनाची स्थिती पाहता शासन नियमांचे पालन करत मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत व अटीशर्थीचे पालन करत उत्साहात मार्गस्थ झाली.
घोटीतील साई पालखीचे शिर्डीला प्रस्थान
ठळक मुद्देशासन नियमाप्रमाणे केवळ ५० भाविकांच्या उपस्थितीत पालखी