सुकेणेतून पंढरपूर दिंडीचे प्रस्थान

By Admin | Updated: June 28, 2016 21:44 IST2016-06-28T21:41:30+5:302016-06-28T21:44:29+5:30

सुकेणेतून पंढरपूर दिंडीचे प्रस्थान

The departure of Pandharpur Dindi from Sukane to Pandharpur Dindi | सुकेणेतून पंढरपूर दिंडीचे प्रस्थान

सुकेणेतून पंढरपूर दिंडीचे प्रस्थान

 कसबे सुकेणे : मुखी हरिनाम, टाळ-मृदंगाचा गजर आणि पावसाची आस उराशी बाळगत मौजे सुकेणे आणि कसबे सुकेणे येथील वारकरी सोमवारी पंढरीच्या दिशेने निघाले.
सालाबादप्रमाणे यंदाही मौजे व कसबे सुकेणे येथून आषाढी एकादशी दिंडीचे सोमवारी प्रस्थान झाले. कसबे सुकेणे व मौजे सुकेणे येथून दरवर्षी पंढरपूर पायी दिंडी सोहळा संपन्न होतो. यंदाही या दिंडीचे प्रस्थान मौजे सुकेणे येथील मारु ती मंदिर, तर कसबे सुकेणे येथील श्रीराम मंदिरापासून झाले. यंदाच्या दिंडी सोहळ्यात कसबे सुकेणे, मौजे सुकेणे, ओणे, थेरगाव, दात्याणे, जिव्हाळे, दीक्षी, वडाळी, शिरसगाव, सोनजांब, मातेरेवाडी येथील वारकरी सहभागी झाले
आहेत.
दिंडीचे पंढपूरपर्यंत एकूण १९ मुक्काम होणार असून, सोळा दिवसांचा प्रवास आहे. दिंडी प्रस्थानाच्या वेळी मौजे सुकेणे व कसबे सुकेणे येथील खापरे महाराज, ज्येष्ठ वारकरी अण्णासाहेब गंगाधर मोगल, प्रकाश गडाख, शंकर काळे, चंद्रभान हंडोरे, शिवाजी हंडोरे, ओण्याचे सुभाष हळदे, पुंजा पाटील, कसबे सुकेणेचे रमेश जाधव, पुंडलिक भोज, बाळासाहेब घोलप, माणिक जाधव, आप्पा लोखंडे, शकुंतला जमधडे, दत्तू घुमरे आदि उपस्थित होते.

Web Title: The departure of Pandharpur Dindi from Sukane to Pandharpur Dindi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.