शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बेलगाव कुऱ्हे ते शिर्डी पालखी पदयात्रेचे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 18:14 IST

नांदूर वैद्य : बेलगाव कुऱ्हे येथील साई सेवा मित्रमंडळाच्या सातव्या बेलगाव कुऱ्हे ते शिर्डी साईबाबा पालखी पदयात्रेस प्रारंभ झाला. साई पालखीचे घरोघरी पूजन करण्यात आले. त्यानंतर मारूती मंदिरापासून साई पालखी मिरवणुकीला ढोल ताशाच्या गजरात सुरुवात करण्यात आली.

ठळक मुद्देअसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित

नांदूर वैद्य : बेलगाव कुऱ्हे येथील साई सेवा मित्रमंडळाच्या सातव्या बेलगाव कुऱ्हे ते शिर्डी साईबाबा पालखी पदयात्रेस प्रारंभ झाला. साई पालखीचे घरोघरी पूजन करण्यात आले. त्यानंतर मारूती मंदिरापासून साई पालखी मिरवणुकीला ढोल ताशाच्या गजरात सुरुवात करण्यात आली.

या मिरवणुकीमध्ये सुंदर असे नृत्य सादर करणाऱ्या आश्वांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते. यावर्षी या पदयात्रेत जवळपास ३० ते ४० महिलांनी आपला सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद देत साई पालखी पदयात्रेचा आनंद घेतला. यानंतर साई पदयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांना निरोप देण्यासाठी परिसरातून तसेच गावातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यानंतर ओम साईराम, साईबाबा की जय च्या गजरात पालखीचे पुढील मार्गाकडे प्रस्थान करण्यात आले. पालखी ७ फेब्रुवारीला सायंकाळी शिर्डीमध्ये पोहोचणार आहे.

पालखी सोहळ्यामध्ये नवनाथ मांडे, गणेश गुळवे, संपत बोराडे, प्रमोद गाडेकर, संदीप गुळवे, पंडित गुळवे, संदीप ठाणगे, किरण गुळवे, संदीप गुळवे, सुनील गुळवे, समाधान गुळवे, ज्ञानेश्वर गुळवे, तसेच सर्व साई समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ हे विशेष मेहनत घेत आहेत. -बेलगाव कुऱ्हे येथून शिर्डीकडे निघालेल्या साईपालखी पदयात्रेत सहभागी झालेले भाविक. (०६ नांदूरवैद्य १)

टॅग्स :shirdiशिर्डीTempleमंदिर