भगूर शाळेत विभागीय विज्ञान प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:17 PM2017-11-24T23:17:12+5:302017-11-25T00:30:10+5:30

शिक्षण मंडळ भगूर संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त नूतन विद्यामंदिरच्या प्रांगणात भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विज्ञाननगरीमध्ये आयोजित विभागीय, संस्थास्तरीय विज्ञान प्रदर्शन व गणित मेळाव्याचे उद्घाटन स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी यांच्या हस्ते झाले.

Departmental science exhibition at Bhagur School | भगूर शाळेत विभागीय विज्ञान प्रदर्शन

भगूर शाळेत विभागीय विज्ञान प्रदर्शन

googlenewsNext

भगूर : शिक्षण मंडळ भगूर संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त नूतन विद्यामंदिरच्या प्रांगणात भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विज्ञाननगरीमध्ये आयोजित विभागीय, संस्थास्तरीय विज्ञान प्रदर्शन व गणित मेळाव्याचे उद्घाटन स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी यांच्या हस्ते झाले.  याप्रसंगी त्या म्हणाल्या की, शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञान व गणित याविषयी गोडी निर्माण होणे काळाची गरज आहे. त्यामुळे विज्ञान व गणित क्षेत्रातील शास्त्रज्ञांचा थोर आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी नासाला भेट दिल्याप्रसंगीचे अनुभव कथन केले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शीतलदास बालाणी होते. प्रमुख पाहुणे म्हणून एकनाथ शेटे, नारायणदास चावला, तानाजी करंजकर, रतन चावला, भगवान देशमुख, प्रसाद आडके, शशिकांत वैद्य, चंद्रशेखर कोरडे, रा.मु. आंबेकर, जितेंद्र भावसार उपस्थित होते.  प्रास्ताविक मधुसुदन गायकवाड यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक लता जोशी, रामदास जाधव, प्रवीण रोकडे, कैलास वाघ, कृष्णा लोखंडे, अनिल कवडे, सुनील कापसे,  अशोक बोराडे, संदीप गायकवाड, ललित भदे, विलास म्हसाळ, कैलास गायकवाड, वैशाली गायकवाड, भारती चौधरी, सारिका भावसार, वैशाली मुठाळ आदिंसह सर्व  शाळांचे विज्ञानशिक्षक उपस्थित होते. 
विज्ञान प्रदर्शनात ग्रामीण भागातील ६० शाळांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये पहिली ते चौथीच्या हसत खेळत गटाच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ पदार्थांपासून उपयुक्त साहित्याची निर्मिती, पाचवी ते आठवीच्या जलसंवर्धन गटातील विद्यार्थ्यांनी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आदी विषयांवर प्रयोग सादर केले.  भविष्यातील ऊर्जास्रोत, शेती तंत्रज्ञान, पाणी शुद्धीकरण, दळणवळण, पर्यावरण संरक्षण, कार्बन डायोक्साईड समस्या व उपाय आदी एकूण १५० विज्ञान प्रकल्प तसेच गणित मेळाव्यात गणितातील गमती-जमती, गणितातील उपकरणे या विषयांवर ४५ प्रकल्प सादर करण्यात आले.

Web Title: Departmental science exhibition at Bhagur School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.