उमराणे सोसायटी सभापतिपदी देवरे

By Admin | Updated: August 19, 2014 01:19 IST2014-08-19T00:06:32+5:302014-08-19T01:19:40+5:30

उमराणे सोसायटी सभापतिपदी देवरे

Deorre as the Umairane Society Chairman | उमराणे सोसायटी सभापतिपदी देवरे

उमराणे सोसायटी सभापतिपदी देवरे

 उमराणे : येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सभापतिपदी नानासाहेब रावबा देवरे यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या कार्यालयात उपाध्यक्ष रत्नाकर देवरे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन अध्यक्षांची निवड करण्यासाठी संचालक मंडळाची सभा घेण्यात आली.
संस्थेचे विद्यमान अध्यक्ष निवृत्ती देवरे यांच्या निधनाने अध्यक्षपदाची जागा रिक्त होती. प्रथमत: निवृत्ती देवरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर नूतन अध्यक्षपदासाठी नानासाहेब देवरे यांचे नाव मोतीराम देवरे यांनी सूचविले. त्यास प्रा. आबा देवरे यांनी अनुमोदन दिले. अध्यक्षपदासाठी एकमेव नाव आल्याने त्यांची बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली. निवृत्ती देवरे यांच्या निधनामुळे सत्कार, फटाके आदिंना फाटा देण्यात आला.
यावेळी कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडूकाका देवरे, विलास देवरे, नंदन देवरे, ग्रामपंचायत सदस्य साहेबराव देवरे, भाऊसाहेब देवरे यांनी निवृत्ती देवरे यांना आदरांजली वाहिली.
यावेळी संचालक मोतीराम देवरे, पांडूरंग देवरे, प्रकाश देवरे, राजेंद्र देवरे, सुभाष गायकवाड, दोधा मोरे, नंदाबाई देवरे, डॉ. दीपक जैन, सचिव संभाजी खेडकर, धर्मा देवरे, संजय देवरे, उमेश देवरे, नाना सावकार, दत्तू देवरे, बाबुराव देवरे, कैलास देवरे, दादाजी देवरे, विश्वास लहू, चिंतामण मगर, सुधीर देवरे, सुरेश देवरे, अरुण मोरे, सुदाम देवरे आदि उपस्थित होते.

Web Title: Deorre as the Umairane Society Chairman