देवळ्यता शिवसेनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 16:00 IST2018-10-05T15:59:55+5:302018-10-05T16:00:05+5:30

देवळा : सकाळी साडेअकरा वाजता पाच कंदील चौकातून बसस्थानकापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चात एका ढकलगाडीवर गॅस सिलेंडर, व दुचाकी ठेवून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी घोषणा देण्यात आल्या.

 Deolayata Shivsena Front | देवळ्यता शिवसेनेचा मोर्चा

देवळ्यता शिवसेनेचा मोर्चा

ठळक मुद्देदुष्काळी परीस्थिती तसेच सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे. शासनाने दर वाढीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.


देवळा : सकाळी साडेअकरा वाजता पाच कंदील चौकातून बसस्थानकापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चात एका ढकलगाडीवर गॅस सिलेंडर, व दुचाकी ठेवून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी घोषणा देण्यात आल्या. दुष्काळी परीस्थिती तसेच सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे. शासनाने दर वाढीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
मोर्चात शिवसेनेचे विधानसभा संपर्क प्रमुख ललित शाईवाले, उपजिल्हाप्रमुख देवा वाघ, बापू जाधव, कृष्णा पवार, सुभाष पवार, बाळू पवार, नंदू जाधव,ईश्वर पाटील, भरत देवरे, विजय जगताप, प्रशांत शेवाळे, विकी देशमुख, भास्कर पवार, भास्कर आहीरे, सचिन गाढे, राजू जाधव, संगीता खैरणार, सुनिता खैरणार, निर्मला खैरणार, आदींसह तालुक्यातील शिवसैनिक व महीला बहुसंख्येने सहभागी झाल्या होत्या.  

Web Title:  Deolayata Shivsena Front