शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

ढील दे दे....दे दे रे भैय्या..., नाशकात पतंगोत्सवाला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2018 16:52 IST

गच्चीवर पतंग उडविण्यासाठी आबालवृद्धांनी केलेली गर्दी ......निमित्त संक्रांतीचे.... ....पतंग काटली तर मोठ्याने होणारा काटे ....काटेचा होणारा सामूहिक जल्लोष, यातच ध्वनिक्षेपकावरून पतंग बढाव... बढाव... बढाव...!

-दत्ता महाले येवला- गच्चीवर पतंग उडविण्यासाठी आबालवृद्धांनी केलेली गर्दी ......निमित्त संक्रांतीचे.... ....पतंग काटली तर मोठ्याने होणारा काटे ....काटेचा होणारा सामूहिक जल्लोष, यातच ध्वनिक्षेपकावरून पतंग बढाव... बढाव... बढाव...! असे म्हणणारी मुले...... येवल्याच्या सुप्रसिद्ध  हलकडी, बॅडचा आवाज यामुळे सर्वत्र आनंददायक, उत्साहवर्धक वातावरणात, निळ्याशार आकाशात क्षितिजापर्यंत विविधरंगी लहान मोठ्या आकाराच्या पतंगांनी सजलेले मनमोहक दृष्य येवला शहराच्या आकाशात शनिवारी  दिसले. केवळ लहान मुले, युवक, मध्यमवयीन व  वृद्धासह महिलाही मोठ्या उत्साहाने पतंग उडवित होत्या. संक्रांत म्हटली कि येवल्यात एक नवा उत्साह संचारतो केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जवळपासच्या सर्व राज्यात येवला पतंग उडविणे व त्याची मजा लुटण्याच्या बाबतीत येवला सुप्रसिद्ध आहे..मकरसंक्रांत उत्सव त्याआधीचा भोगीचा व  त्यानंतरचा  दिवस करीचा असे 3 दिवस  शहरातील सर्वच व्यवसाय ठप्प असतात. संपूर्ण कापड पेठेत अघोषित संचारबंदी असते. धडपड मंच,खटपट मंच,जय बजरंग फ्रेंडस सर्कल,मधली गल्ली येथे फडकणारे 12 फड्कीचे आकर्षक पतंग दिमाखाने फडकत नववर्षासह मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतानाचे चित्र शहरवासिय संक्रांतीला पाहत आहे. आबालवृद्ध भान हरपून पतंग उडवितात चहापाणी,नाश्ता जेवण,सर्व काही आपापल्या धाब्यावर व गच्चीवरच असते.  पतंग शौकिनांनी  पतंग उडविण्याचा आनंद आज लुटत आहेत. आणि संक्रांतीच्या करीला अर्थात सोमवारी पुन्हा एकदा दिवाळी साजरी करीत मोठ्या प्रमाणावर फॅन्सी फटक्याची आतिषबाजी अनुभवयास मिळणार आहे.

टॅग्स :kiteपतंगNashikनाशिक