देवळाली कॅम्पला ‘धूलिवंदन’चा जल्लोष

By Admin | Updated: March 14, 2017 00:21 IST2017-03-14T00:21:42+5:302017-03-14T00:21:56+5:30

सैनिकांमध्येही उत्साह : सोसायटी, कॉलन्यांमध्ये रंगात रंगले सारे

Deolali Camps 'Dulivandan' Comes Out | देवळाली कॅम्पला ‘धूलिवंदन’चा जल्लोष

देवळाली कॅम्पला ‘धूलिवंदन’चा जल्लोष

  देवळाली कॅम्प : पाण्याचा कमीत कमी वापर करीत देवळाली कॅम्प परिसरात धुळवड आणि होलीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. गुजराथी बांधवांचा रंगोत्सव जल्लोषात रंगला
देवळाली कॅम्प परिसरात सर्वधर्मियांनी होली व धुलीवंदन सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला. परिसरातील सोसायटी, कॉलनी परिसरातील लहान थोरांनी एकमेकांना रंग लाऊन रंगोत्सव साजरा केला. देवळालीत धुलीवंदन खेळण्याची परंपरा ब्रिटीश काळापासून आहे. सर्वधर्म समभाव जपत नागरिक सणाचा आनंद घेतात. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून गोडधोड जेवणासह दुपारनंतर वीरांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. लॅमरोडवरील भैरवनाथ मंदिर, गवळी वाड्यातील झुलेलाल मंदिर, शिंगवेबहुला, लहवित, वंजारवाडी तर माळावरील महालक्ष्मी मंदिर आदि ठिकाणी मोठमोठ्या होळींसमोर वीरांची गर्दी दिसून येत होती. (वार्ताहर)

Web Title: Deolali Camps 'Dulivandan' Comes Out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.