शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

देवळा तालुका : थकबाकीमुळे सहकार विभागाची कारवाई23 संचालक अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:06 IST

देवळा : तालुक्यातील १६ सोसायटीतील २३ संचालकांना सोसायटी कर्जाची थकबाकी असल्यामुळे अपात्र ठरविण्यात आले असून, त्यांचे संचालकपद रद्द झाल्याची माहिती सहाय्यक निबंधक एस.एस. गिते यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्हा बँकेला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रयत्न सुरूथकबाकी वसुलीसाठी जोरदार मोहीम

देवळा : तालुक्यातील १६ सोसायटीतील २३ संचालकांना सोसायटी कर्जाची थकबाकी असल्यामुळे अपात्र ठरविण्यात आले असून, त्यांचे संचालकपद रद्द झाल्याची माहिती सहाय्यक निबंधक एस.एस. गिते यांनी दिली. सोसायटीच्या ४५ थकबाकीदार संचालकांनी ५५ लाख ५७ हजार ७१६ रुपये थकबाकी भरल्याने त्यांचे संचालक पद कायम राहिले आहे. नासिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर केदा अहेर यांनी जिल्हा बँकेला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्हा बँकेच्या थकबाकी वसुलीसाठी त्यांनी जोरदार मोहीम सुरू केली आहे. यामुळे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या थकबाकीदार सभासदांची पैशांची जमवाजमव करण्यासाठी धावपळ सुरू आहे. सहकार विभागानेही देवळा तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या ६८ थकबाकीदार संचालकांना ३१ डिसेंबर, २०१७ रोजी नोटीस काढली होती. तीन वेळा या थकबाकीदार संचालकांना संधी देण्यात आली असता यापैकी ४५ संचालकांनी त्यांच्याकडील अल्पमुदत, मध्यम मुदत व पीककर्जाची थकबाकी ५५ लाख ५७ हजार ७१६ रुपये भरल्यामुळे त्यांचे संचालकपद कायम राहिले. उर्वरित २३ संचालकांकडे असलेली थकबाकी वसूल न झाल्यामुळे सहाय्यक निबंधक एस.एस. गिते यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७८ अ (१) अन्वये संचालकपद रद्द करण्याचा आदेश पारीत करून २३ संचालकांचे संचालकपद रद्द केले आहे. सहकार अधिकारी डी.एन. देशमुख यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले.सोसायटी संचालकपद रद्द झालेले गावनिहाय संचालक गुंजाळनगर-२, विठेवाडी-१, देवळा आदिवासी सोसायटी-२, फुले माळवाडी-२, देवपूरपाडा-१, लोहोणेर-१, शेरी वार्शी २, खामखेडा-१, सरस्वतीवाडी-१, भिलवाड-२, वाजगाव -२, कुंभार्डे-२, तिसगाव -१, न्यू वासूळ- १, सांगवी -१, जे.डी. पवार सोसायटी, भऊर-१.पिंपळगाव मोरचे सरपंच, उपसरपंच अपात्रइगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचांना नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी अपात्र घोषित केले आहे. ग्रामसभा न घेतल्याने सरपंच अपात्र, तर यापूर्वीचा अविश्वास ठराव विधिग्राह्य ठरवल्याने उपसरपंचांना पद गमवावे लागले आहे. भाजपा नेत्याच्या गटाला यामुळे मोठा धक्का बसला आहे. पिंपळगाव मोरच्या सरपंच कल्पना नामदेव खोडके यांनी अनिवार्य असणाºया ग्रामसभा आणि मासिक सभा घेतल्या नसल्याची बाब पंढरीनाथ काळे यांना माहिती अधिकारातून समजली.यानुसार ग्रामपंचायत सदस्य जीवन नामदेव गातवे यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाºयांकडे विवाद अर्ज दाखल केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुराव्यांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सरपंच कल्पना नामदेव खोडके यांना अपात्र ठरविले आहे. उर्वरित काळात त्यांना सरपंचपदाची निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे. दुसºया प्रकरणात उपसरपंच अलका संपत काळे यांच्यावरील अविश्वास ठराव इगतपुरीचे तहसीलदार अनिल पुरे यांनी मंजूर केला होता. त्यांच्या निर्णयाला अलका काळे यांनी आव्हान देऊन अप्पर जिल्हाधिकाºयांकडे विवाद अर्ज दाखल केला होता. त्यानुसार सर्वांगीण पुरावे, दोन्ही पक्षांचा युक्तिवाद यानुसार अविश्वास ठराव विधिग्राह्य असल्याचा निर्वाळा देऊन उपसरपंच अलका काळे यांना अपात्र ठरवण्यात आले आहे.