देवळावासीयांना घरपोहोच भाजीपाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 23:00 IST2020-04-20T23:00:10+5:302020-04-20T23:00:21+5:30
आमदार डॉ. राहुल आहेर व जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष जोत्स्ना आहेर, उपनगराध्यक्ष अतुल पवार, गटनेते अशोक आहेर यांनी देवळा शहरातील निमगल्ली, सुभाष रोड, पेठगल्ली, पोस्ट गल्ली परिसरातील नागरिकांना लॉकडाउन काळात पुरेल एवढा भाजीपाला घरपोहोच पुरविला असून, नगरपंचायत परिसरातील इतर नागरिकांनाही सुविधा देण्यात येणार असल्याचे गटनेते आहेर यांनी सांगितले.

देवळावासीयांना घरपोहोच भाजीपाला
देवळा : आमदार डॉ. राहुल आहेर व जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष जोत्स्ना आहेर, उपनगराध्यक्ष अतुल पवार, गटनेते अशोक आहेर यांनी देवळा शहरातील निमगल्ली, सुभाष रोड, पेठगल्ली, पोस्ट गल्ली परिसरातील नागरिकांना लॉकडाउन काळात पुरेल एवढा भाजीपाला घरपोहोच पुरविला असून, नगरपंचायत परिसरातील इतर नागरिकांनाही सुविधा देण्यात येणार असल्याचे गटनेते आहेर यांनी सांगितले. त्याचा शुभारंभ संभाजी आहेर, उपनगराध्यक्ष अतुल पवार, गटनेते अशोक आहेर, डॉ. प्रशांत निकम, डॉ. अनिल चव्हाण, प्रतीक आहेर, अनिल देवरे, सुरज बिल्लोरे, भगवान कानडे, अतुल आहेर आदींच्या उपस्थितीत करण्यात आला.