शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

दंत उपचाराचा शासकीय योजनेत समावेश व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 12:44 AM

महाराष्ट डेंटल असोसिएशनच्या राज्यस्तरीय तीनदिवसीय अधिवेशनाचा रविवारी नाशकात समारोप झाला. नाशिकमध्ये झालेल्या या अधिवेशनात दंत वैद्यकीय उपचार शासनाच्या अटल आरोग्य योजना आणि विम्यात अंतर्भूत करावेत, तसेच दंत वैद्यकांनादेखील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शासनसेवेत घेऊन ग्रामीण भागातील मौखिक आरोग्यासाठी शासनाने पुढाकार घेण्यासह अन्य ठराव करण्यात आले.

नाशिक : महाराष्ट डेंटल असोसिएशनच्या राज्यस्तरीय तीनदिवसीय अधिवेशनाचा रविवारी नाशकात समारोप झाला. नाशिकमध्ये झालेल्या या अधिवेशनात दंत वैद्यकीय उपचार शासनाच्या अटल आरोग्य योजना आणि विम्यात अंतर्भूत करावेत, तसेच दंत वैद्यकांनादेखील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शासनसेवेत घेऊन ग्रामीण भागातील मौखिक आरोग्यासाठी शासनाने पुढाकार घेण्यासह अन्य ठराव करण्यात आले. अधिवेशनाच्या उद्घाटनानंतर एमराल्ड पार्कमध्ये झालेल्या या अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यभरातील दोन हजारहून अधिक दंत वैद्यकीय तज्ञ नाशकात आले होते. विविध तज्ञांची मार्गदर्शनपर भाषणे, प्रबंध सादरीकरणासह विविध विषयांवरील चर्चासत्रेदेखील अधिवेशनात उत्साहात पार पडली.अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ. संजय भावसार यांनी सर्व उपस्थितांच्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले.अधिवेशनातील ठरावदंत वैद्यकीय उपचार हे शासनाच्या अटल आरोग्य योजना किंवा आयुष्यमान विमा योजनेत समाविष्ट करून मौखिक आरोग्याचाही त्यात अंतर्भाव करावा. तसेच दंत वैद्यकांनादेखील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शासनसेवेत घेऊन ग्रामीण भागातील मौखिक आरोग्याबाबत सकारात्मक पाऊल टाकावे. त्यासाठी शासनस्तरावर निधी निर्माण करून तिथे सुसज्ज मौखिक आरोग्य यंत्रणा उभारून सामान्य जनतेच्या मौखिक आरोग्याबाबत कार्यवाही करावी. संघटनेच्या वतीने नियमितपणे मोफत मौखिक आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करणे, तंबाखू- गुटख्याबाबत जनजागृती करणे, असा ठरावदेखील अधिवेशनात करण्यात आला. विद्यापीठांनी दंत वैद्यकीय कोर्सेसला मान्यता द्यावी, तसेच राज्यपालांनी विधानपरिषदेवर दंत वैद्यकीय क्षेत्रातील एका डॉक्टरची नेमणूक करावी, अशी मागणीदेखील ठरावाद्वारे करण्यात आली आहे.

टॅग्स :docterडॉक्टरDental Care Tipsदातांची काळजीGovernmentसरकार