डेंग्यू सदृश आजाराने सिडकोतील महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: October 30, 2015 23:33 IST2015-10-30T23:31:43+5:302015-10-30T23:33:20+5:30

डेंग्यू सदृश आजाराने सिडकोतील महिलेचा मृत्यू

Dengue-related illness CIDCO woman's death | डेंग्यू सदृश आजाराने सिडकोतील महिलेचा मृत्यू

डेंग्यू सदृश आजाराने सिडकोतील महिलेचा मृत्यू

सिडको : डेंग्यू सदृश आजारावर खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पवननगर येथील महिलेचा शुक्रवारी (दि़ ३०) दुपारी मृत्यू झाला़ या महिलेचे नाव रेखा संतोष भुसे (३५) असे आहे़
याबाबत अधिक माहिती अशी की, मूळचे अकोला येथील मात्र सद्यस्थितीत पवननगरमध्ये राहणाऱ्या रेखा भुसे यांना ताप आल्याने त्यांच्यावर चार दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते़ त्यांचा मृत्यू हा डेंग्यूने झाल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे़ त्यांच्या पश्चात पती, मुलगा असा परिवार आहे़
दरम्यान, भुसे यांच्या मृत्यूस महापालिका प्रशासन जबाबदार असून भुसे कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा महात्मा फुले समता परिषदेचे शहराध्यक्ष संतोष सोनपसारे यांनी दिला आहे़

Web Title: Dengue-related illness CIDCO woman's death