शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूचा कहर : नऊ महिन्यांच्या बालकाचा नाशकात डेंग्यूने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 15:01 IST

जुने नाशिकमधील कथडा परिसरात या आजारांनी नागरिक त्रस्त झाले असून याच भागात राहणारे रिक्षाचालक नवाज शेख यांचा एकुलता एक मुलगा अशरफ हा अवघ्या नऊ महिन्यांचा झाला होता. त्याला डेंग्यूच्या डासाने दंश केल्याने त्याची प्रकृती खालावली.

ठळक मुद्देडासांची उत्त्पत्तीठिकाणे तत्काळ शोधून नष्ट करण्यावर भर देण्याची गरज बालकाचा डेंग्यूशी लढा अपयशी ठरला.प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेऊन निद्रीस्त

नाशिक : शहरातील गावठाण परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुने नाशिक मधील कथडा भागात एका कु टुंबातील नऊ महिन्यांच्या बालकाचा डेंग्यूसदृश्य आजाराने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपुर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.शहर व परिसरात डेंग्यू, चिकुणगुण्या यांसारख्या आजारांचा फैलाव ‘एडीस’ जातीच्या डासांपासून होत असून दुसरीकडे विषाणूजन्य आजारांनीही डोके वर काढल्याने नागरिक हैराण झाले आहे; मात्र महापालिकेच्या आरोग्य विभाग अद्यपही सुस्त असून विषाणूजन्य अजारांसह डेंग्यू, चिकुणगुण्यासारख्या आजारांचा प्रादूर्भाव रोखण्यास आरोग्य विभाग, शहरी आरोग्य विभाग व हिवताप नियंत्रण विभाग पुर्णत: अपयशी ठरले आहे. सध्या महापालिके मधील प्रशासकिय कारभारासह लोकप्रतिनिधींचा कारभारही थंडावला आहे. लोकप्रतिनिधींचे अधिकाºयांवर वचक न राहिल्याने प्रशासनाकडून शहरात मुलभूत सोयीसुविधांची कामे करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. डेंग्यू, चिकुणगुण्या यासारख्या आजाराने थैमान घातले असतानाही प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेऊन निद्रीस्त झाल्याचे दिसून येत आहे.जुने नाशिकमधील कथडा परिसरात या आजारांनी नागरिक त्रस्त झाले असून याच भागात राहणारे रिक्षाचालक नवाज शेख यांचा एकुलता एक मुलगा अशरफ हा अवघ्या नऊ महिन्यांचा झाला होता. त्याला डेंग्यूच्या डासाने दंश केल्याने त्याची प्रकृती खालावली. रोगप्रतिकारक शक्तीचा अधिक विकास कमी वयामुळे न झाल्याने बालकाचा डेंग्यूशी लढा अपयशी ठरला. शुक्रवारी उपचारादरम्यान चिमुकल्याची प्राणज्योत मालवली. कथडा भागातील सुमारे दहा ते पंधरा कुटुंबांमध्ये डेंग्यूसदृश्य आजाराची लागण झालेले रुग्ण औषधोपचार घेत आहेत. या भागात डेंग्यूच्या डासांची उत्त्पत्तीठिकाणे तत्काळ शोधून डासांच्या अळ्या, अंडी, कोष नष्ट करण्यावर भर देण्याची गरज आहे. कथडा परिसरापासून महापालिकेचे डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय अगदी जवळ जरी असले तरी या रुग्णालयात दर्जेदार गुणवत्तापुर्ण औषधोपचार रुग्णाला मिळेलच याची शाश्वती देता येत नाही. त्यामुळे नागरिक शक्यतो या रुग्णालयात जाणे टाळतात.---

टॅग्स :dengueडेंग्यूNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाDeathमृत्यूHealthआरोग्य