डेंग्यूच्या फै लावाला प्रशासन जबाबदार
By Admin | Updated: November 7, 2015 22:23 IST2015-11-07T22:18:46+5:302015-11-07T22:23:48+5:30
डेंग्यूच्या फै लावाला प्रशासन जबाबदार

डेंग्यूच्या फै लावाला प्रशासन जबाबदार
नाशिक : शहरवासीयांना पुन्हा डेंग्यूचा डंख बसत असताना पालिकेचे अधिकारी व सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी मात्र कुंभमेळ्याच्या यशानेच हुरळून निघाले आहेत. यामुळे नाशिककरांच्या आरोग्याकडे प्रशासन व महापौरांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप शिवसेनेचे महानगरप्रमुख गटनेता अजय बोरस्ते यांनी पत्रकार परिषदेत केला.
शहरामध्ये अद्याप ७० लोकांचा स्वाइन फ्ल्यूने मृत्यू झाला आहे, तर डेंग्यूने डोके वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात प्रभावीपणे डास प्रतिबंधात्मक औषध-धूर फवारणी करण्याची मागणी बोरस्ते यांनी केली आहे. डास प्रतिबंधात्मक औषध फवारणीचा ठेका संपून पंधरवडा उलटला आहे. तरीदेखील अद्याप प्रशासनाकडून याबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच सत्ताधारी मनसे पक्षाचे लोकप्रतिनिधींनाही कुठलेही सोयरसुतक नसल्याचे बोरस्ते यांनी यावेळी सांगितले. याबाबत महापौरांनी पुढाकार घेऊन आजारांच्या निर्मूलनासाठी जनजागरण व स्वच्छता मोहिमेला आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सुरुवात करण्याची गरज आहे.
सत्ताधारी लोकप्रतिनिधी व अधिकारी कुंभमेळ्याच्या यशाने हुरळून गेले असून, ज्या कर्मचाऱ्यांच्या जोरावर सिंहस्थ पालिकेने यशस्वी क रून दाखविला त्यांना अद्याप दिवाळीचा सानुग्रह अनुदानदेखील जाहीर करणे प्रशासनाने पसंत केलेले नाही, त्यामुळे पालिका प्रशासनाच्या स्वार्थी भूमिके चा प्रत्यय येत आहे.
येत्या सोमवारी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान जाहीर न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरून पालिकेच्या सत्ताधारी व प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन उभे करेल, असे त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)