डेंग्यू आजाराचे थैमान सुरुच
By Admin | Updated: June 3, 2016 00:12 IST2016-06-02T23:38:53+5:302016-06-03T00:12:47+5:30
चांदवड : एक बालिका रुग्णालयात दाखल

डेंग्यू आजाराचे थैमान सुरुच
चांदवड : शहरातील वरचे गाव, शिंपी गल्ली व प्रभाग क्रमांक १० मध्ये डेंग्यूच्या आजाराचे थैमान सुरूच असून, पुन्हा तीन बालकांना या आजाराने घेरले आहे. तर गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एक सातवर्षीय बालिका या आजाराने नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश खैरनार यांनी केली आहे. या आजाराने वरचे गावातील चार वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला, तर आता नव्याने तन्वी गिरीश खैरनार ही ७ वर्षीय बालिका नाशिक येथे उपचार घेत आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वी गौरी कुणाल लुटे (३), साई योगेश सोनवणे (६), श्रुती चंद्रकांत ठाकूर (१३) ही तीन बालके नाशिक व पिंपळगाव येथे उपचार घेऊन बरी होऊन घरी परतले. एक महिन्यापूवी गौरव अरुण महाले यांची भाची तन्वी योगेश बोरसे (४ वर्षे) हिचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाला. तर अमोल बिल्लाडे यांच्या मुलीचाही डेंग्यु आजाराने मृत्यू झाला. सार्थक किशोर बोरसे व प्रथमेश मनोज बोरसे (७ वर्षे), साई महेश व्यवहारे (८ वर्षे), प्रसाद किशोर सोनवणे (१४ वर्षे) यांनाही लागण झाली होती. आता तन्वी खैरनार हिलाही डेंग्यू आजाराने दाखल केल्याने सर्वत्र घबराट पसरली आहे. ( वार्ताहर)