देना बॅँक शाखेचे संगणकीय काम ठप्पा

By Admin | Updated: December 21, 2014 00:46 IST2014-12-21T00:15:12+5:302014-12-21T00:46:49+5:30

देना बॅँक शाखेचे संगणकीय काम ठप्प

Dena Bank Branch's computing work place | देना बॅँक शाखेचे संगणकीय काम ठप्पा

देना बॅँक शाखेचे संगणकीय काम ठप्पा

ह्मणगाव : येथील देना बॅँक शाखेतील आॅनलाइन सुविधेसह संगणकीकृत यंत्रणा वेळोवेळी ठप्प होत असल्याने त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. त्यामुळे या शाखेतील संगणकीकृत व्यवस्थेत बदल करून सुव्यवस्थित संगणकीय सुविधा उपलब्ध करण्याची मागणी ग्राहकांतर्फे करण्यात येत आहे.
येथील देना बॅँकेत ब्राह्मणगावसह परिसरातील अनेक गाव-वस्त्यांवरील लोक दैनंदिन आर्थिक व्यवहारासाठी येत असतात. या ग्राहकांच्या सेवेसाठी बॅँकेने संगणकीकृत आॅनलाइन सुविधादेखील उपलब्ध केलेली आहे.
मात्र ही संगणकीकृत यंत्रणा वारंवार ठप्प होत असते. ती सुरू होण्यास कधी काही मिनिटांचा, तर कधी काही तासांचा कालावधी लागत असतो. त्यामुळे तासन्तास सर्वसामान्य ग्राहकांचा खोळंबा होत असतो.
याशिवाय बॅँकेतर्फे एटीएम सुविधा सुरू आहे. मात्र सदर यंत्र बॅँकेच्या आतच असल्याने बॅँकेच्या वेळेतच या सुविधेचा लाभ घेता येतो. इतर वेळी एटीएम बॅँकेत कुलूप बंद राहत असल्यामुुळे ते असून, नसल्यासारखे असते. त्यामुळे सदर एटीएमचा लाभ २४ तास मिळायला हवा, अशी ग्राहकांची मागणी आहे.
(वार्ताहर)

Web Title: Dena Bank Branch's computing work place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.