व्यापाऱ्यांना नकली नोटा ओळखण्याचे प्रात्यक्षिक
By Admin | Updated: October 19, 2015 23:55 IST2015-10-19T23:54:46+5:302015-10-19T23:55:33+5:30
व्यापाऱ्यांना नकली नोटा ओळखण्याचे प्रात्यक्षिक

व्यापाऱ्यांना नकली नोटा ओळखण्याचे प्रात्यक्षिक
आझादनगर : मालेगाव येथील आझादनगर पोलीस ठाणे आवारात जनता को. आॅप- बँकेच्या विद्यमाने सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता व्यापाऱ्यांना नकली नोटा ओळखण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. यावेळी उपस्थित व्यापाऱ्यांनी नकली नोटांबाबत सावध भूमिका घ्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक मसूद खान यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक सलीम गाझीयानी उपस्थित होते.
सध्या दसरा-दिवाळीच्या सणासुदीचे दिवस आहेत. बाजारात खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचाच गैरफायदा घेऊन काही लोकांकडून नकली नोटा चलनात आणण्याचे प्रमाण वाढले. यात व्यापाऱ्यांची फसवणूक होते. कधीकधी कटू प्रसंगांनाही सामोरे जावे लागते. त्यामुळे आझादनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी मसूद खान यांनी नकली नोटा कशा ओळखाव्यात यासाठी जनता बँकेचे चंदनपुरी गेट शाखाप्रमुख शेख रशीद खाटीक यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले. खऱ्या नोटा व नकली नोटा यातील फरक काय असतो, हे समजावून सांगितले. यात खऱ्या नोटांमध्ये गांधीजींचा फोटो किती ठिकाणी असतो, नकली नोटांचा पेपर जाड प्रतीचा असतो, असे सांगत जनजागृती करण्यात आली. यावेळी मोहंमद आबीद हुसैन, पोलीस अधिकारी, कर्मचारी व परिसरातील व्यापारी मोठ्या संख्येने हजर होते. (वार्ताहर)