जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची काळ्या फिती लावून निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:11 IST2021-07-16T04:11:59+5:302021-07-16T04:11:59+5:30
राज्य सरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक-शिक्षकेतर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि कंत्राटी व अंशकालीन कर्मचारी यांच्या मागण्यांबाबत गेल्या दोन वर्षांपासून वारंवार ...

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची काळ्या फिती लावून निदर्शने
राज्य सरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक-शिक्षकेतर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि कंत्राटी व अंशकालीन कर्मचारी यांच्या मागण्यांबाबत गेल्या दोन वर्षांपासून वारंवार निवेदने, निदर्शने, आंदोलने करूनही केंद्र व राज्य शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. कोरोना महामारीच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण कार्यात जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून फ्रंटलाइन वर्कर म्हणून कर्तव्य बजावले. मात्र केंद्र सरकारने खासगी कंपनीला खासगीकरणाचे कंत्राट दिले आहे. देशात पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती भडकल्याने बेसुमार महागाईने राज्य सरकारी कर्मचारी त्रस्त असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे. जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांनी शासकीय कामाचे वेळी काळ्या फिती लावून, दुपारचे भोजन सुट्टीत निदर्शने केली. यावेळी अरुण आहेर, डॉ. भगवान पाटील, महेंद्र पवार, प्रमोद निरगुडे, सचिन विंचूरकर, बापू चौरे, जी.बी. खैरनार, निवृत्ती बगड, रणजित पगारे, आर.पी. अहिरे, योगेश गोलेसर, किशोर वारे, विक्की पिंगळे, रवींद्र आंधळे, सलीम पटेल, भास्कर कूवर, हेमंत मंडलिक, शेखर पाटील, किरण निकम, विश्वास लव्हारे, ज्ञानेश्वर गायकवाड, आर.डी. मोरे, नंदू अहिरे, साईनाथ ठाकरे, विलास शिंदे, मनोज रोटे, रवींद्र थेटे आदी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
(फोटो १५ झेडपी)