मालेगावी वीज वितरण कंपनीच्या तांत्रिक कामगार युनियनची निदर्शने
By Admin | Updated: November 25, 2015 22:24 IST2015-11-25T22:23:33+5:302015-11-25T22:24:22+5:30
मालेगावी वीज वितरण कंपनीच्या तांत्रिक कामगार युनियनची निदर्शने

मालेगावी वीज वितरण कंपनीच्या तांत्रिक कामगार युनियनची निदर्शने
मालेगाव कॅम्प : मालेगावी वीज वितरण कंपनीच्या तांत्रिक कामगार युनियनतर्फे विविध मागण्यांसाठी मोती भवन कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. कंपनीविरोधात घोषणा देण्यात आल्या. आपल्या मागण्यांचे निवेदन कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले.
दुपारी तांत्रिक कामगार युनियनचे कामगार मोठ्या संख्येने मोती भवनवर जमा झाले. त्यांनी द्वारसभा घेऊन निदर्शने केली. निवेदनात म्हटले आही की, तांत्रिक युनियन कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत ते त्वरित मार्गी लावावे, विभागीय पातळीवर तांत्रिक कामगारांचे (नियमित) आदेश काढावेत, ज्या कर्मचाऱ्यांचे वय ५८ वर्षे पूर्ण झाले आहे त्यांचे पेन्शन फॉर्म, ग्रॅज्युईटी अर्ज, भविष्यनिर्वाह निधी अर्ज संबंधित कर्मचाऱ्यांना कळवून भरून घेणे, पदोन्नती वेळेवर देणे, कर्मचाऱ्यांच्या अतिरिक्त कामाचा मेहनताना (ओ. टी. बिले), प्रवास भत्ते त्वरित देणे, अनेक उपकेंद्रात मूलभूत सुविधा, सुरक्षेच्या दृष्टीने साधनसामग्री देणे, दुरवस्था झालेली उपकेंद्रे दुरुस्ती करणे आदि मागण्यांचा समावेश आहे.
याप्रसंगी तांत्रिक युनियन कामगार संघटनेचे विभागीय सचिव एस. बी. शेवाळे, विभागीय अध्यक्ष एस. आर. राहुडे, सचिन प्रभाकर व्यवहारे, प्रवीण वाघ, एस. एन. हिरे, विठ्ठल बिरू, भिकनसिंग परदेशी, राजू बोरसे, आत्माराम पाटील आदिंसह असंख्य सदस्य, कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)