अंशकालीन स्त्री परिचरांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:15 IST2021-07-27T04:15:45+5:302021-07-27T04:15:45+5:30
अंशकालीन स्त्री परिचरांना रु. १८ हजार रुपये वेतन मिळावे अशी मागणी यापूर्वीच आरोग्य संचालकांकडे करण्यात आली असून, त्यांनी १०,००० ...

अंशकालीन स्त्री परिचरांची निदर्शने
अंशकालीन स्त्री परिचरांना रु. १८ हजार रुपये वेतन मिळावे अशी मागणी यापूर्वीच आरोग्य संचालकांकडे करण्यात आली असून, त्यांनी १०,००० हजार रुपये वेतन देण्यात यावे अशी शिफारस केली आहे. मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. आरोग्य खात्यात अन्य कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणीसह अनेक आर्थिक लाभ मिळतात; पण समान कामाला समान वेतन हे सूत्र स्त्री परिचरांना डावलले जाते. त्यामुळे अंशकालीन परिचरांना जि. प. सेवेत कायम करा, कोविडचा कामाचा प्रोत्साहन भत्ता देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करा, प्रोत्साहन भत्ता द्या भत्ता द्या, अंशकालीन स्त्री परिचरांच्या वारसांना सेवेत घ्या, पेन्शन योजना लागू करा, अंशकालीन स्त्री परिचरांना गणवेश द्या, अंशकालीन स्त्री परिचरांचे नाशिक जिल्ह्यातील फरक रक्कम त्वरित खात्यावर जमा करावी आदी मागण्यांचे निवेदन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले.
आंदोलनात कॉ. राजू देसले, चित्रा जगताप, हसीना शेख, अंजना काळे, रंजना आहेर, शांता बागुल, वेणू दरोडे, मीरा गोसावी, विटा धुळे, कोंदनबाई ढगे, मंगला जाधव, कुसुम काळे, शालिनी बागुल, सुशीला सोनवणे, तुलसा निकम, माधुरी मेटकर, उषा जोशी, शाबू गायकवाड, सुनीता सोनवणे, मनोहर गायकवाड आदी सहभागी झाले होते.