ओबीसी आरक्षणासाठी तैलिक समाजाची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:11 IST2021-07-04T04:11:16+5:302021-07-04T04:11:16+5:30

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या त्र्यंबकेश्वर शाखेतर्फे तहसीलदार दीपक गिरासे यांना सदर निवेदन देण्यात आले. यावेळी तहसीलदार दीपक गिरासे यांच्या ...

Demonstrations by the oil community for OBC reservation | ओबीसी आरक्षणासाठी तैलिक समाजाची निदर्शने

ओबीसी आरक्षणासाठी तैलिक समाजाची निदर्शने

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या त्र्यंबकेश्वर शाखेतर्फे तहसीलदार दीपक गिरासे यांना सदर निवेदन देण्यात आले. यावेळी तहसीलदार दीपक गिरासे यांच्या वतीने निवासी नायब तहसीलदार रामकिसन राठोड यांनी निवेदन स्वीकारले. तत्पूर्वी समाजबांधवांनी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. तहसील कार्यालयासमोर निदर्शने करत ओबीसी घटकांचे आरक्षण कायम करावे म्हणून घोषणा देण्यात आल्या. मोर्चात देवस्थानचे विश्वस्त तथा तैलिक समाजाचे तालुकाध्यक्ष संतोष कदम, तेली समाज शहराध्यक्ष देवेंद्र तथा बाळासाहेब कदम, ज्येष्ठ नेते रवींद्र उगले, बाळासाहेब सावंत, किशोर पाटील, सचिन कदम, चेतन उगले मिलिंद उगले, रवींद्र उगले, कुणाल उगले सुनील गायकवाड, नीलेश मोरे, बापू आहेर, केशव ढोन्नर आदींसह ओबीसी समाजातील बांधव सहभागी झाले होते.

इन्फो

उपोषणास परवानगी नाकारली

तैलिक महासभेच्या आदेशानुसार तैलिक समाज शाखा त्र्यंबकेश्वर यांनी शांततेच्या मार्गाने व शासनाच्या कोविड नियमांचे पालन करून सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मंडप टाकून लाक्षणिक उपोषणास बसण्यासाठी त्र्यंबक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्याकडे परवानगी मागितली होती, पण त्यास पोलिसांनी परवानगी नाकारल्याने निवेदन देण्यात आले.

फोटो- ०३ त्र्यंबक तैलिक

त्र्यंबकेश्वर येथे ओबीसी आरक्षणासाठी मागण्यांचे निवेदन देताना तैलिक समाजबांधव.

030721\03nsk_43_03072021_13.jpg

फोटो- ०३ त्र्यंबक तैलीकत्र्यंबकेश्वर येथे ओबीसी आरक्षणासाठी मागण्यांचे निवेदन देताना तैलीक समाज बांधव. 

Web Title: Demonstrations by the oil community for OBC reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.