हॉकर्स टपरीधारकांची महापालिकेसमोर निदर्शने

By Admin | Updated: May 18, 2017 17:56 IST2017-05-18T17:56:02+5:302017-05-18T17:56:02+5:30

धोरणाला विरोध : अद्ययावत नोंदणीची मागणी

Demonstrations before the Municipal Corporation of Hawkers | हॉकर्स टपरीधारकांची महापालिकेसमोर निदर्शने

हॉकर्स टपरीधारकांची महापालिकेसमोर निदर्शने

नाशिक : महापालिकेने राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत तयार केलेल्या हॉकर्स झोनच्या आराखड्याला विरोध दर्शवित नाशिक जिल्हा हॉकर्स टपरीधारक युनियनच्या नेतृत्वाखाली फेरीवाल्यांनी राजीव गांधी भवनसमोर निदर्शने केली. महापालिकेने फेरीवाल्यांची अद्ययावत नोंदणी करून सुचविलेल्या पर्यायी जागांचा विचार करावा, अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली.
गुरुवारी (दि.१८) महापालिकेची महासभा बोलाविण्यात आली होती. त्यामुळे आपल्या प्रश्नांकडे महासभेचे लक्ष वेधण्यासाठी हॉकर्स व टपरीधारकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली. त्यानंतर आयुक्तांना निवेदन देण्यात आले. 

Web Title: Demonstrations before the Municipal Corporation of Hawkers