हिंदू समितीची शहरात निदर्शने
By Admin | Updated: July 29, 2015 00:34 IST2015-07-29T00:00:03+5:302015-07-29T00:34:50+5:30
हिंदू समितीची शहरात निदर्शने

हिंदू समितीची शहरात निदर्शने
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिकला येणाऱ्या साधू-महंताना सर्व सुविधा द्याव्यात तसेच कुंभमेळ्याच्या विशेष रेल्वे गाड्यांवरील जादा दरवाढ मागे घ्यावी यासाठी हिंदू जनजागृती समिती, हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.
दुपारी चार वाजता भर पावसात करण्यात आलेल्या या आंदोलनात काही साधू-महंतही सहभागी झाले होते. कुंभमेळ्यानिमित्त येणाऱ्या भाविकांच्या रेल्वे प्रवासात केंद्र सरकारने दरवाढ केली असून, ती त्वरित मागे घेण्यात यावी तसेच देशभरातून येणाऱ्या साधू-महंतांना सर्व सुविधा पुरवाव्यात अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी घोषणाबाजी करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.