असहिष्णुविरोधात शहरात निदर्शने
By Admin | Updated: November 7, 2015 23:24 IST2015-11-07T23:24:19+5:302015-11-07T23:24:51+5:30
असहिष्णुविरोधात शहरात निदर्शने

असहिष्णुविरोधात शहरात निदर्शने
नाशिक : देशातील कथित असहिष्णु वातावरणाच्या विरोधात शहरातील मुस्लीम समाजातील कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
यावेळी या कार्यकर्त्यांनी
विविध मागण्या पंतप्रधानांकडे केल्या. त्यात गोहत्त्याबंदी संपूर्ण देशात लागू करावी, परंतु गोवंश हत्त्या मात्र लागू करू नये, मुस्लीम समाजाला सरकारी, औद्योगिक, सहकार आणि अन्य सर्वत्र ५ टक्के आरक्षण लागू करावे, गोहत्त्येच्या नावाखाली ज्या मुस्लिमांची हत्त्या झाली त्यांच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी, तसेच हत्त्या करणाऱ्यांना कडक शासन करावे, मुस्लीम समाजावरील अत्याचाराच्या विरोधातील कायदा रोखण्यासाठी अॅट्रोसिटीच्या धर्तीवर कायदा करावा, विकासाच्या नावावर मुस्लीम धार्मिक स्थळे तोडणे बंद करावे, अशा मागण्या यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या
आहेत.
निदर्शने करणाऱ्यांमध्ये रशिदलाल शाह, शेख गुलाम ताहेर, हनिफ बशीर, बालम पटेल, इरफान, रफीक साबीर, अजीज पठाण, सोनू पठाण, फारूक शेख, जावेद इब्राहिम, वसीम शेख, इसाक कुरेशी यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)