राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने

By Admin | Updated: June 17, 2015 02:05 IST2015-06-17T02:05:06+5:302015-06-17T02:05:29+5:30

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने

Demonstrations on behalf of Nationalist Congress Party | राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने

नाशिक : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधातील कारवाई ही युती सरकारने राजकीय सुडातून केलेली कारवाई असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे. ही कारवाई तत्काळ थांबविण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने व रास्ता रोको करण्यात आला.
तसेच यावेळी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून हा पुतळा ताब्यात घेतला. दुपारी बारा वाजेपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहर व जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भुजबळ यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी त्याची शहानिशा करणे आवश्यक होते.

Web Title: Demonstrations on behalf of Nationalist Congress Party