‘लोकतांत्रिक’च्या वतीने निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 00:17 IST2018-08-18T22:46:43+5:302018-08-19T00:17:15+5:30

दिल्लीत जंतरमंतर येथे संविधान जाळणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी लोकतांत्रिक जनता दलाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर निदर्शने करण्यात आली.

Demonstrations on behalf of 'Democratic' | ‘लोकतांत्रिक’च्या वतीने निदर्शने

‘लोकतांत्रिक’च्या वतीने निदर्शने

नाशिकरोड : दिल्लीत जंतरमंतर येथे संविधान जाळणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी लोकतांत्रिक जनता दलाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. विभागीय आयुक्त राजाराम माने यांना लोकतांत्रिक जनता दलाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधितांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निदर्शनामध्ये जिल्हाध्यक्ष तृषाल अंभोरे, अमर दोंदे, अविनाश पगारे, तारीक शेख, शरद साळवे, विराज दाणी, अमोल निकम, सागर बर्वे, भारती साळवे, पूनम दोंदे, अक्षय अहिरे आदी सहभागी झाले होते.

Web Title: Demonstrations on behalf of 'Democratic'