देवळ्यात भाजयुमोच्या वतीने निदर्शने.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 17:16 IST2019-12-19T17:15:50+5:302019-12-19T17:16:48+5:30
देवळा : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या कथित वक्तव्याचा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष किशोर आहेर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांना निवेदन देण्यात आले.

देवळ्यात भाजयुमोच्या वतीने तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ यांना निवेदन देताना किशोर आहेर, भाऊसाहेब आहेर, समाधान सोनजे,बापू बच्छाव, रोहित पाटील, विष्णू शेवाळे, सुनील सावंत, ज्ञानेश्वर बागुल, विलास सोनजे आदि.
ठळक मुद्देदेवळा येथील पाच कंदील चौकात भाजयुमोच्या वतीने निदर्शने करण्यात येऊन राहुल गांधी यांच्या कथित वक्तव्याबद्दल तिव्र निषेध करण्यात आला. निवेदनात म्हटले आहे की राहुल गांधी यांनी जाहीर सभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अपशब्द वापरून निंदनीय कृत्य केले आहे
देवळा : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या कथित वक्तव्याचा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष किशोर आहेर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष भाऊसाहेब आहेर, तालुका सरचिटणीस समाधान सोनजे, कमलेश आहेर, गणेश भदाणे, हितेश गांगुर्डे, प्रवीण पवार, कैलास आहेर, रोहित सोनवणे, अंकुश सावंत, अनिल पगार, राकेश आहेर, दिनकर आहेर, विलास आढाव, विलास सोनजे, शेखर आहेर, आदी उपस्थित होते.