शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

प्राणी क्रुरता प्रतिबंध समितीसाठी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 01:18 IST

प्राण्यांवरील होणारे अन्याय-अत्याचार रोखण्यासाठी ‘सोसायटी फॉर प्रिव्हेंशन क्रुएल्टी आॅन अ‍ॅनिमल’(एसपीसीए) नावाची समिती शहरात गठित करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाला दिले आहे

नाशिक : प्राण्यांवरील होणारे अन्याय-अत्याचार रोखण्यासाठी ‘सोसायटी फॉर प्रिव्हेंशन क्रुएल्टी आॅन अ‍ॅनिमल’(एसपीसीए) नावाची समिती शहरात गठित करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाला दिले आहे; मात्र अद्याप समिती गठित करण्याबाबत कुठलीही पावले उचलली जात नसल्याने मानव उत्थान मंचच्या वतीनने सोमवारी (दि.३०) अशोकस्तंभावरील पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयापुढे निदर्शने करण्यात आली.  राज्य सरकारने २००१ साली अध्यादेश काढून प्राणी क्रुरता प्रतिबंध समिती विविध जिल्ह्यांमध्ये गठित करावी, असे आदेश केंद्र सरकारच्या नियमानुसार दिले. त्यानंतर महाराष्टतील काही शहरांमध्ये अशाप्रकारची समिती गठित करण्याचे प्रयत्न सुरू झाले; मात्र राज्यात काही मोजक्याच शहरांमध्ये या प्रयत्नांना यश आले आहे. नाशिकमध्येही अशाप्रकारे समिती गठित करून या समितीद्वारे जिल्हाधिकाºयांच्या नियंत्रणाखाली जनावरांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज असल्याची मागणी मानव उत्थान मंचकडून जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे करण्यात आली होती. यानंतर जिल्हाधिकाºयांनी पशुसंवर्धन उपआयुक्तांसोबत चर्चा करून पंधरा सदस्य असलेली समिती शासनाच्या नियमानुसार गठित करण्याच्या सूचना दिल्या; मात्र यानंतर कुठल्याही प्रकारे प्रयत्न संबंधितांकडून होऊ शकले नाही, असा आरोप करत मंचाचे जसबीर सिंग, भारती जाधव, हेमंत जाधव, ज्योती ग्रोवर, प्रियंका वाघ, धनश्री कुलकर्णी, हेमल लडानी आदी प्राणिप्रेमींनी कार्यालयापुढे निदर्शने करीत नाशिकमध्ये ‘एसपीसीए’ का नाही? असा प्रश्न उपस्थित केला.  शासकीय स्तरावरून त्याबाबत ठोस पावले उचलली जात नसल्याने प्राणिमित्रांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. पाळीव अथवा भटक्या प्राण्यांवर कु ठल्याहीप्रकारे क्रू रपणे अत्याचार करत असेल तर या समितीमार्फत ते थांबविण्यासाठी तत्काळ प्रयत्न करण्यात येतील आणि अत्याचार थांबतील, असे मंचाचे म्हणणे आहे.जनावरांचाही मूक सहभागनिदर्शन करणाºयांसह काही प्राणिप्रेमी जे आपल्या पाळीव प्राण्यांना घेऊन जनावरांच्या दवाखान्यात उपचारासाठी आले होते. त्या नागरिकांनीही निदर्शनाला पाठिंबा देत आपल्या पाळीव प्राण्यांसमवेत सहभाग घेतला. यावेळी काही मांजरी, कुत्रे, शेळी, बोकड यांचाही आपसूकच या निदर्शनामध्ये मूक सहभाग नोंदविला गेल्याने निदर्शने लक्षवेधी ठरली.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय