शिक्षण विभागाच्या अनागोंदीविरोधात निदर्शने
By Admin | Updated: April 3, 2016 03:49 IST2016-04-03T03:49:21+5:302016-04-03T03:49:23+5:30
माध्यमिक शिक्षक संघाचा मोर्चाचा इशारा

शिक्षण विभागाच्या अनागोंदीविरोधात निदर्शने
नाशिक : माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील अनागोेंदी कारभार व काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात शनिवारी (दि.२) जिल्हा परिषदेसमोर अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. या निदर्शनात जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, मुख्याध्यापक संघ, शिक्षक माध्यमिक लोकशाही आघाडी, जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनाही सहभागी झाल्या होत्या.
माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील अनागोेंदी कारभार, कामकाजातील भ्रष्टाचाराच्या वारंवार तक्रारी करूनही त्यावर काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. शिक्षक संघटनेच्या बैठका घेण्यास मुद्दाम टाळाटाळ करणे आदिंसह विविध मागण्यांचा समावेश होता. या मागण्यांवर कार्यवाही न झाल्यास आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या कारभारात सुधारणा न झाल्यास विभागाच्या पाचही जिल्ह्यांतील संघटनांचा विभागीय आयुक्त कार्यालयावर मोेर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात अखिल भारतीय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष फिरोज बादशाह, कचेश्वर बारसे, शिवाजीराव निरगुडे, गोरख सोनवणे, कैलास देवरे, रवींद्र मोरे, आर. डी. निकम, टी. एम. डोंगरे, बी. आर. पाटील, पुरुषोत्तम धांडे, विलास पाटील आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)