सामाजिक अत्याचार प्रतिबंधक कृती समितीतर्फे निदर्शने
By Admin | Updated: July 25, 2016 00:09 IST2016-07-24T23:59:47+5:302016-07-25T00:09:21+5:30
सामाजिक अत्याचार प्रतिबंधक कृती समितीतर्फे निदर्शने

सामाजिक अत्याचार प्रतिबंधक कृती समितीतर्फे निदर्शने
कोपर्डी घटनेचा निषेध : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा नाशिक : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे घडलेली घटना अत्यंत कू्रर असून, मानवतेला काळिमा फासणारी आहे. या घटनेमुळे महिला तसेच मुली असुरक्षित असल्याचे वास्तव समोर आले असून, या घटनेचा निषेध करण्यासाठी सामाजिक अत्याचार प्रतिबंध कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनात असे कू्रर कृत्य करणाऱ्या नराधमांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा, या प्रकरणातील आरोपींचा खटला जलदगती न्यायालयात वर्ग करून तातडीने शिक्षा करण्यात यावी, निष्णात वकिलांची नियुक्ती करावी आदि मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी राजू देसले, सुनील मालसुरे, युवराज बावा, अॅड. प्रभाकर वायचळे, महादेव खुडे, कुणाल जाधव, अनिल निरभवणे, करुणासागर पगारे, कृष्णा शिलावट, संगीता कुमावत, संतोष जाधव आदि सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)