वासाळी येथे डांगी जनावरांचे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 00:33 IST2020-01-15T22:47:27+5:302020-01-16T00:33:01+5:30

इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे अंबिका यात्रोत्सवानिमित्ताने नाशिक जिल्हा परिषद पशुसंवर्धन व कृषी विभागामार्फत भरविण्यात आलेल्या डांगी जनावरांच्या प्रदर्शनाचे व कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांच्या हस्ते झाले.

Demonstration of Dangi animals at Vasali | वासाळी येथे डांगी जनावरांचे प्रदर्शन

वासाळी येथे डांगी जनावरांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना मधुकरराव पिचड, सरपंच काशीनाथ कोरडे, निवृत्ती जाधव, काशीनाथ कोरडे आदी.

ठळक मुद्देबक्षिसे जाहीर : अंबिका यात्रोत्सवानिमित्त आयोजन

टाकेद : इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे अंबिका यात्रोत्सवानिमित्ताने नाशिक जिल्हा परिषद पशुसंवर्धन व कृषी विभागामार्फत भरविण्यात आलेल्या डांगी जनावरांच्या प्रदर्शनाचे व कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांच्या हस्ते झाले.
या समारंभाला आमदार माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, विष्णुपंत म्हैसधुणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, पं. स.सदस्य सोमनाथ जोशी, पशुसंवर्धन विभागाचे व्ही. डी. गर्गे, कृषी विभागाचे शिंदे, तवल शीतलकुमार, सहायक आयुक्त जी. आर. पाटील, डॉ एम. व्ही. निकम, डॉ. व्ही. एम. कवाडे, पशुधन विकास अधिकारी एम. एम. ठाकूर, एच. के. कुलकर्णी, सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी एम. टी. फिरके, घोटीचे सरपंच मनोहर घोडे उपस्थित होते.
मान्यवरांचे स्वागत सरपंच काशीनाथ कोरडे व उपसरपंच पार्वतीबाई जाधव यांनी केले. सूत्रसंचालन विजयकुमार कर्डक यांनी केले.
प्रदर्शनातूनच जातिवंत जनावरांची खरेदी-विक्रीही सुरू झाली. या प्रदर्शनात साधारण ३0 हजार जनावरे आली होती.

निवड झालेल्या पशुधनाचे शेतकरी
डांगी वळू : प्रथम : राजाराम भीमा घोटे, धामणी, द्वितीय : सोमभाऊ गंभीर, गंभीरवाडी, तृतीय : विष्णू शंकर बांडे, मांजरगाव, उत्तेजनार्थ : रामजी केरू वाजे, डुबेरे, किसन रामा खाडे, बारी, बाबूराव किसन भोईर, पाडळी.
४आदात डांगी वळू : प्रथम : गणपत गंगाराम पिचड(डोंगरवाडी अकोले), द्वितीय : अमृता मुरलीधर कुल्हाड (पेढेवाडी अकोले), तृतीय : धोंडीराम किसन बिन्नर (केळी अकोले),
४उत्तेजनार्थ : सचिन लक्ष्मण घोडे (समशेरपूर अकोले), दिनकर चंदर बोटे (माणिक ओझर), दत्तू तुकाराम फेकणे (अवनखेड).
४गाय कालवड : प्रथम : भाऊसाहेब कचरू भोसले (धामणी), द्वितीय : अंकुश गोरख भोसले(धामणी), तृतीय : दशरथ निवृत्ती बेंडकोळी(पेढेवाडी)
उत्तेजनार्थ : ज्ञानदेव विठोबा कासार, अमोल सुरेश भोसले.

Web Title: Demonstration of Dangi animals at Vasali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.