सीटू युनियनतर्फे कामगार उपायुक्त कार्यालयासमोर निदर्शने

By Admin | Updated: March 18, 2017 20:56 IST2017-03-18T20:56:01+5:302017-03-18T20:56:01+5:30

औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना मिळणाऱ्या ग्रॅच्युईटीच्या दिवसात सरकारने वाढ करावी, या मागणीसाठी सीटू युनियनच्या वतीने कामगार उपायुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

Demonstration before the CITU union's labor deputy office | सीटू युनियनतर्फे कामगार उपायुक्त कार्यालयासमोर निदर्शने

सीटू युनियनतर्फे कामगार उपायुक्त कार्यालयासमोर निदर्शने

सातपूर : औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना मिळणाऱ्या ग्रॅच्युईटीच्या दिवसात सरकारने वाढ करावी, या मागणीसाठी सीटू युनियनच्या वतीने कामगार उपायुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
औद्योगिक कामगारांना ग्रॅच्युईटी मिळावी म्हणून १९७२ साली कायदा करण्यात आला आहे. या कायद्यात सरकारने दुरु स्त्या केलेल्या आहेत. ग्रॅच्युईटीचे दिवस वाढविण्याऐवजी मिळणाऱ्या पैशाच्या मर्यादेत वाढ केली आहे. ज्यांचे वेतन जास्त आहे म्हणजेच मोठ्या कारखान्यातील कामगारांनाच याचा फायदा होत आहे. लघु उद्योगातील कामगारांना फायदा होत नाही. म्हणून सर्व आस्थापनातील कामगारांना वार्षिक ३० दिवसांची ग्रॅच्युईटी मिळावी आणि पाच वर्षे सेवेची अट काढून टाकावी, अशी मागणी कामगार उपायुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तत्पूर्वी प्रवेशद्वारासमोर कामगारांनी निदर्शने केली होती. यावेळी सीताराम ठोंबरे, कल्पना शिंदे, सिंधू शार्दूल, अशोक लहाने, एन. डी. सूर्यवंशी, संजय पवार, खंडेराव झाडे, तुकाराम सोनजे, सतीश खैरनार, अ‍ॅण्ड. भूषण सातळे, संतोष काकडे आदिंसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Demonstration before the CITU union's labor deputy office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.