दलित अत्याचार निषेधार्थ निदर्शने
By Admin | Updated: July 15, 2014 00:44 IST2014-07-15T00:03:41+5:302014-07-15T00:44:52+5:30
दलित अत्याचार निषेधार्थ निदर्शने

दलित अत्याचार निषेधार्थ निदर्शने
नाशिक : राज्यात गेल्या काही दिवसांपासून दलित, मागासवर्गीय, आदिवासींवर अत्याचार होत आहेत. अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अशा समाजकंटकांवर कारवाई करावी, या मागणीसाठी अत्याचार विरोधी समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
केवळ राज्यातच नव्हे तर देशातही अनेक ठिकाणी असे प्रकार घडत आहेत. जातीयवाद्यांनी थैमान घातले असून, सामाजिक एकता धोक्यात आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हेगारांवर कारवाई करावी, अशी मागणी राहुल तुपलोंढे, ताराचंद मोतमल, अरुण शेजवळ, मनोहर दोंदे, रामदास उन्हाळे, किरीज पठाण, रजत खैरनार, सदावर्ते, सुनील कांबळे, उमेश वाघमारे, ज्योती निकम, फुलचंद जाधव आदिंंनी केले आहे.